बायोपिक 'शकुंतला देवी'चे नवीन गाणे 'माँ पहेली' प्रदर्शित..

अमेझॉन प्राइम व्हिडिओवर जगभरातल्या सर्व आई आणि मुलींना समर्पित करत, शंकुतला देवीचे नवे गाणे 'माँ पहेली' प्रदर्शित !
अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या बहुप्रतीक्षित बायोपिक 'शकुंतला देवी'चे नवीन गाणे 'माँ पहेली' प्रदर्शित केले आहे. या गाण्याचे चित्रण शकुंतला देवीचे तिच्या मुलीशी असलेले अनोखे नाते दर्शवते - एक असे नाते जे केवळ त्या दोघीच समजू शकतात. या सुंदर गाण्याला श्रेया घोषाल यांनी आपला आवाज दिला असून सचिन-जिगर यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत प्रिया सरैया यांनी लिहिले आहे.
‘मां पहेली’ जगभरातील सर्व बहादुर मातांना आणि त्यांच्या अद्भुत मुलींना समर्पित एक गीत आहे, जे प्रेम, मैत्री आणि बलिदानाशी नाते सांगते.
सादर गाण्याची लिंक: https://youtu.be/dM6U4HxWMEs
अनु मेनन द्वारे निर्देशित आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रोडक्शन आणि विक्रम मल्होत्रा (एबंडंशिया एंटरटेनमेंट) द्वारे निर्मित, शकुंतला देवी मध्ये सान्या मल्होत्रा देखील आहे. या सोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा अनु मेनन आणि नयनिका महतानी यांनी लिहिली असून संवाद इशिता मोईत्रा यांचे आहेत. हा चित्रपट 31 जुलैला जगभरात 200 देश आणि प्रदेशात एक्सक्लूसिवपणे अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी तयार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight