झी टॉकीज साजरा करणार यारी दोस्तीचा स्पेशल रविवार

फ्रेंडशिप डे निम्मित झी टॉकीज घेऊन येत आहे  ‘यारी दोस्ती स्पेशल संडे’
खरी मैत्री जर असेल तर ती आयुष्यभर टिकते अस मानलं जातंहि गोष्ट बऱ्याच चित्रपटांद्वारे अधोरेखित करण्यात येतेम्हणूनच झी टॉकीज फ्रेंडशिप डे  निम्मित घेऊन येत आहे चार सुपरहिट चित्रपटांचा नजराणा.
नागराज मंजुळे दिग्दर्शितबॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जाणारा सुपरहिट चित्रपट सैराट’ रविवार  ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रसारित होणार आहे.  महेश कोठारेलक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या त्रिकुटाच्या अभिनयाने नटलेला 1985 सालचा सुपरहिट विनोदी चित्रपट धूम धडाका दुपारी 3 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेअजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारासचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी हि बनवा बनवी’ संध्याकाळी   वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहरितेश देशमुखने ज्या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असा आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट लय भारी रात्री  वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाद्वारे या मोहोत्सवाचा समारोप होणार आहे.
मैत्रीचा हा दिवस साजरा करण्यासाठी पाहायला विसरु नका यारी दोस्तीचा स्पेशल संडे २ ऑगस्ट रोजी फक्त आपल्या  झी टॉकीजवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight