भारताचे पहिले एआय-शक्तीयुक्त संभाषणात्मक एजंट सुरू

यूएसजीआयसीने मोटर विमा करिता भारताचे पहिले एआय-शक्तीयुक्त संभाषणात्मक एजंट सुरू केले
मुंबई, 30 जुलै 2020ः कोव्हिड-19 या साथीच्या रोगाने थैमान घालून  संपूर्ण जगात  ग्राहक सेवां विस्कळीत केली आहे आणि लोकांच्या आयुष्यात अकल्पनीय बदल केले आहेत. या अप्रत्याशित परिस्थितीत, युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्सने ग्राहक-प्रथम संस्था म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शक्तियुक्त मोटार दावे सेवांसाठी आभासी एजंट्स सुरू केले आहेत.
युनिव्हर्सल सोमपोचे एआय-शक्तीयुक्त आभासी एजंट हे मानवी एजंट्सद्वारे पारंपारिकरित्या हाताळल्या जाणार्या नित्यक्रम संभाषणे स्वयंचलित करण्यासाठी संभाषणात्मक एआय वापरेल. द फर्स्ट नोटीस ऑफ लॉस (एफएनओएल), जी  क्लेम प्रोसेसिंगची पहिली पायरी आहे, ही सहसा कॉल सेंटर-आधारित सेवा असते ज्यात विस्तृत प्रश्न आणि डेटा एकत्रित करणे आवश्यक असते. ज्या ग्राहकांचा मोटर अपघात झाला आहे आणि जे त्वरित दावा नोंदवू इच्छित आहेत ते सहसा ताणतणावात असतात आणि कॉल रांगेत न लागता दावा नोंदण्यासाठी सोयीचे मार्ग शोधतात. 
ग्राहक सेवा प्रतिनिधींचे नियमितपणे कॉल एआय-समर्थित वर्च्युअल एजंट्सकडे वळवून दिल्याने ग्राहकांला खूप चांगला अनुभव मिळेल. दावा नोंदणी प्रक्रियेतील संपूर्ण टर्नअराऊंड टाइम (टीएटी) वर लक्षणीय परिणाम होईल, ज्यामुळे दावा दाखल करण्याची प्रतीक्षा वेळ कमी होईल, दाव्यांच्या स्थितीची तपासणी केली जाईल, पॉलिसी माहितीचा आढावा घेतला जाईल आणि अशा सर्व गोष्टी आणि बरेच काही - सर्व सामान्यपणे लाइव्ह एजंट्स व्यवस्थापित करतील. भारतातील विमा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच झालेल्या या निराकरणामुळे युनिव्हर्सल सोमपो येथील ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांतच संपेल.
"दावा अधिसूचना विमा मधील एक महत्वाचा ग्राहक टचपॉईंट आहे. कोविडनंतरच्या काळात आमचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपण कधीही ग्राहक कॉल कसे चुकवू नये हे आहे. एआय ऑटोमेशनमुळे आमच्या ग्राहकांना आणि बॅकएंडच्या ऑपरेशन्ससाठी अनुभव सुव्यवस्थित होईल आणि आमचा त्यावर जोर आहे, असे  ”युनिव्हर्सल सोमपो जनरल विमा कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शरद माथुर म्हणाले.
ग्राहकाचे हित सर्वतोपरी मानणारी एक जबाबदार संस्था म्हणून युनिव्हर्सल सोमपो नियामक बदलांच्या अनुषंगानेच नव्हे तर आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी स्वतःचे तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा वाढवत आहे. म्हणूनच, भविष्याचा सामना करण्याकरिता आणि इतरांच्या पुढे राहण्यासाठी, नुकतेच पीओएस चॅनेलसाठी मोबाइल (प्लिकेशन (एम-पीओएस), डिजिटल वॉलेटसह पेमेंट इंटिगेशन, पीक विमा प्रणाली आणि ग्राहक सेवा-सेवा पोर्टल इत्यादी विविध उपक्रम अलीकडेच उभारलेले आहेत.
लवकरच, युनिव्हर्सल सोमपो अनेक एआय आणि डिजिटल सोल्यूशन्सची सह-निर्मिती करणार आहेत जे उत्पादकता नुकसानाची भरपाई करण्यास मदत करतील आणि नवीन ऑपरेटिंग वातावरणात यशस्वीरित्या आव्हानांचा सामना करतील. हे टेक ट्रेंड ओळखणे, व्यवसायाच्या संधींचे मूल्यांकन करणे आणि बाजारपेठेतील स्पर्धेत सक्रिय राहून आणि इतरांपेक्षा चांगले प्रदर्शन करण्यासाठी व्यवसायाच्या मॉडेलमध्ये आवश्यक प्रक्रिया आणि प्रोग्राम सक्रियपणे समाविष्ट करण्यास उत्सुक आहे. शिवाय, कंपनी सोपी, नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांची गरज-आधारित उत्पादने वितरीत करण्याचा प्रयत्न करेल.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार