‘चार दिवस सासूचे’ ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा.आपल्या कलर्स मराठीवर..

महाराष्ट्राची महामालिका चार दिवस सासूचे कलर्स मराठीवर !
३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा.
मुंबई २७ जुलै, २०२० :  ‘…… डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे ... हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली महामालिका चार दिवस सासूचे...  सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव. आपल्या संस्कृतीत सुखीसंपन्न कुटुंबाचा कणा आहेआनंदी असं वैवाहिक जीवन. आपला संसार सुखी करण्यासाठीसासरच्या अंगणात आयुष्यभर चंदनासारखी झिजणारी सून… सासरच्या अंगणात नांदायला आलेली ही "सून" कालांतरानी "सासू" होतेनवी सून घरात येते आणि एका तिखट गोड’ नात्याची सुरुवात होते. सर्व नात्यात वरचढथोडा संघर्ष,थोडी कुरबुरतर थोडी माया असते आणि असचं एक नातं म्हणजे "सासू सुनेचं” नातं. ह्या नात्यातील मर्म आणि सूत्र ज्या "सासू सुनेला" सापडतंते घर आनंदानी बहरतं. आई आणि सासू या एकाच नाण्याच्या दोन बाजू... आईची सासू होतानाची घालमेल, तिचे विचार, तिची भीती हे कोणीच समजू नाही शकणार... मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात... चार दिवस सासूचे ही मालिका देखील याच कथासुत्रावर आधारलेली आहे... आशालता देशमुख यांचीदेखील त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी अशीच स्वप्न आहेत... पण जेंव्हा त्यांचा मुलगा घरात अनुराधाला सून म्हणून घेऊन येतो तेंव्हा काय होतं? आशालता देशमुख यांचे  मन ती कसे जिंकेल ? अनुराधा कसं घराला सांभाळून घेईल ? हे बघणे नक्कीच उत्सुकतेचे असणार आहे... आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड - मेढेकर हिने साकारली आहे. तेंव्हा नक्की बघा महाराष्ट्राची महामालिका चार दिवस सासूचे ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 
           आशालता देशमुख हे खूप मोठ प्रस्थ आहे... घरामध्ये त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो आणि त्यांनी घेतलेला निर्णय कोणी बदलू शकत नाही... रवी म्हणजेच आशालता यांचा मुलगा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांच्या अपरोक्ष अनुराधाशी लग्न करतो आणि तिला सून म्हणून घरी आणतो... अनुराधा अत्यंत साधी, समंजस, स्वाभिमानी मुलगी... रवीने त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे ही गोष्ट अनुराधाला माहिती नाही... देशमुखांच्या घरात ती सून म्हणून येते आणि तिच्या खर्‍या प्रवासाला सुरूवात होते... "तुझं माझं" ह्या वाटणीतभावनांचा - नात्यांचा कस पणाला लागतो आणि उरतो तो "गृह कलह"... अनुराधा घराला कशी सांभाळते, तिच्या वाटेवर आलेल्या संकटांना ती कशी खंबीरपणे सामोरी जाते ? या संघर्षात तिला रवीची साथ मिळते ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा चार दिवस सासूचे’…  
        सासू आणि सुनेमध्ये कितीही मतभेद असले तरीही एक धागा मात्र दोघींना बांधणारा असतो आणि तो म्हणजे कुटुंब’… सासू काय किंवा सून काय दुसऱ्या घरातून सासरी येतात आणि सासरच्याच होऊन जातात. कुटुंबावरील प्रेम हा धागा दोघींना एका बंधनात बांधतो आणि हळूहळू या नात्यात प्रेम निर्माण होतं… आणि मग दोघींच्या पंखाखाली "कुटुंबाचं घरटं" सुखात नांदतंकसा असेल आशालता देशमुख आणि अनुराधाचा प्रवास... द्वेषाचे प्रेमात रूपांतर कसे होईल ? हे जाणून घेण्यासाठी बघा चार दिवस सासूचे ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight