केमकॉन

अमेरिकेत प्रसिद्धी किंवा वितरणासाठी निषिद्ध.

वडोदरा येथील केमकॉन स्पेशिअलिटी केमिकल्स लिमिटेडचा आयपीओ 21 सप्टेंबर 2020* रोजी खुला

• किमान बोलीसाठी एकगठ्ठा 44 इक्विटी समभाग आणि त्यानंतर 44 इक्विटी समभागांच्या पटीत.

• किंमत पट्टा Rs.338 – Rs. 340 प्रती इक्विटी समभाग 

• इश्यू खुला होण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2020* आणि इश्यू बंद होण्याची तारीख – 23 सप्टेंबर, 2020

• प्लोअर प्राईज ही इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 33.8 पटीत तर कॅप प्राईज इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 34 पटीत. 

केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स लिमिटेड (“कंपनी” किंवा इश्युअर “केमकॉन”) च्या वतीने प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव प्रती ₹ 10 दर्शनी मूल्य असलेले [●] इक्विटी समभाग रोख किंमत ₹[●] प्रती इक्विटी समभाग (₹[●] प्रती इक्विटी समभागाच्या प्रीमियमसह समाविष्ट) (“इश्यूचे मूल्य”) ₹[●] दशलक्ष सरासरीपर्यंत. या इश्यूत [●] इक्विटी समभागाचा ताजा इश्यू ₹1,650 दशलक्ष सरासरीपर्यंतचा समाविष्ट. (“ताजा इश्यू”) आणि विक्रीकरिता असलेला प्रस्ताव सरासरी ₹[●] दशलक्ष किंमतीचे 4,500,000 इक्विटी समभाग याप्रमाणे असून, त्यात कमलकुमार राजेंद्र अगरवाल यांच्याद्वारे ₹ [●] दशलक्ष किंमतीचे 2,250,000 इक्विटी समभाग  आणि नरेश विजयकुमार गोयल यांच्याद्वारे सरसरी ₹[●] दशलक्ष किंमतीचे 2,250,000 इक्विटी समभाग, (एकत्रित, “विक्रेता समभागधारक”) (“विक्रीकरिता ऑफर”, आणि ताज्या इश्यूसह एकत्रित “इश्यू”. या इश्यूमध्ये कंपनीच्या  इश्यू-पश्चात पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटल [●] % आहे. 

मुंबई, 18 सप्टेंबर, 2020: विशेष रसायनांचा अग्रगण्य निर्माता असलेल्या केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स लिमिटेडचा प्राथमिक सार्वजनिक प्रस्ताव दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी खुला करण्यात येणार असून दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी बंद होईल. या व्यवहारासाठी किंमत पट्टा प्रती इक्विटी समभाग Rs. 338 – Rs. 340 याप्रमाणे राहील. या व्यवहारासाठी दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी बोली/प्रस्ताव खुला होण्याआधी एक कार्यालयीन दिवसापूर्वी पायाभूत गुंतवणुकदारांनी बोली दाखल करून वाटप प्रक्रियेत सहभागी होता येईल. ही कंपनी हेक्सामिथाईलडीसायलाझने (HMDS) आणि क्लोरोमिथाईल इसोप्रोपाईल कार्बोनेट (CMIC) अशा विशेष रसायनांची अग्रगण्य निर्मितीदार असून रसायनांचा वापर औषधनिर्मिती क्षेत्रांद्वारे करण्यात येतो. तेलखाण उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या इनऑर्गनिक ब्रोमाईड्सची निर्मिती या कंपनीद्वारे करण्यात येते. 

फ्रॉस्ट अँड सुल्लीवन रिपोर्ट अनुसार ही कंपनी भारतात एचएमडीएसची केवळ एकमेव निर्मितीदार आहे. चालू वर्ष 2019 मध्ये निर्मितीच्या दृष्टीने एचएमडीएसची तिसरी सर्वात मोठी निर्मितीदार ठरली. पुढे फ्रॉस्ट अँड सुल्लीवन रिपोर्ट अनुसार कंपनी भारतात सीएमआयसी निर्मितीमधील पहिली सर्वात मोठी निर्मितीदार असून जगात दुसऱ्या क्रमांकाची निर्मितीदार आहे. या कंपनीने  सध्या 2 नवीन उत्पादने विकसीत केली असून त्यांची नावे 4-क्लोरोब्यूटारल क्लोराईड (‘4CBC’) आणि 2,5 डीएचटी (2,5-डायड्रोक्सी-1,4-डीथाईन) अशी आहेत. जुलै 2020 दरम्यान 4 सीबीसी’ची पहिली विक्री यापूर्वीच करण्यात आली आहे. 

* बीआरएलएमच्या मार्गदर्शनातंर्गत तसेच एसईबीआय आयसीडीआर तरतुदीनुसार कंपनी आणि विक्रेता समभागधारकांसह पायाभूत गुंतवणुकदारांचा सहभाग ग्राह्य धरण्यात आला आहे. पायाभूत गुंतवणुकदारांसाठी बोली दिनांक ही बोली/इश्यू खुला होण्याआधी एक दिवस म्हणजे दिनांक 18 सप्टेंबर 2020 यानुसार राहील.  

हा इश्यू बुक बिल्डींग प्रक्रियेद्वारे सिक्यूरीटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) 2018 ची तरतूद 6(1) अन्वये सुधारीत करण्यात आली असून क्यूआयबी इश्यू आकाराच्या 50% हून अधिक नसावे, अ-संस्थात्मक खरेदीदार हे इश्यू आकाराहून 15% पेक्षा कमीचे नसतील तसेच वैयक्तिक बोली विक्रेते इश्यू आकाराहून 35% कमीचे नसावेत.

वित्तीय वर्ष 2020 दरम्यान कंपनीची कामकाजातून होणारी उलाढाल Rs. 262.05 कोटी तर ईबीआयटीडीए Rs. 70.26 कोटी तसेच नफ्यानंतरचा कर Rs. 48.85 कोटी याप्रमाणे राहिला. आर्थिक वर्ष 18 आणि आर्थिक वर्ष 20 दरम्यान विक्रीत 29% सीएजीआर वृद्धी, ईबीआयटीएमध्ये 25% EBITA आणि पीएटी 36%. 31 मार्च 2020 रोजी कंपनीची एकूण उधारी Rs. 44.51 कोटी, तर डेट इक्विटी रेशिओ 0.31 याप्रमाणे होता.  

याशिवाय कंपनीचे प्रमुख ग्राहकांसोबत दीर्घकालीन नाते असून त्यात लौरस लॅब्ज लिमिटेड, हेटेरो लॅब्ज लिमिटेड, ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्स लिमिटेड, लॅनटेक फार्मास्युटीकल्स  लिमिटेड, इंड-स्विफ्ट लॅबोरेटरीज लिमिटेड, वॉटर सिस्टीम्स स्पेशियलिटी केमिकल डीएमसीसी, सीसी ग्रान लिमिटेड, श्री राधा ओव्हरसीजसारख्या नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे केमकॉन स्पेशियलिटी केमिकल्स लिमिटेड कंपनी स्वत:ची उत्पादने अमेरीका, जर्मनी, इटली, दक्षिण आफ्रिका, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, जपान, युनायटेड अरब एमिराटस्, सर्बिया, रशिया, स्पेन, थायलंड आणि मलेशियाला निर्यात करते. कंपनीच्या वतीने निर्मिती सुविधा केंद्राचा विस्तार करण्यासाठी ताज्या इश्यूतून जमा झालेला काही भाग वापरण्यात येईल. त्याचपद्धतीने खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांकरिता विनियोग करण्यात येईल.  

इंटेन्सीव्ह फिस्कल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि अँबीट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बीआरएलएम आहेत. 

केमकॉनविषयी

केमकॉन ही ‘औषध निर्मिती मध्यस्थ, सिलन्स आणि ऑईलफिल्ड केमिकल उत्पादन आणि पुरवठा’ करणारी आयएसओ 9001:2015 आणि 14001:2015 प्रमाणित कंपनी आहे. फ्रॉस्ट अँड सुल्लीवन अहवालानुसार ही कंपनी जागतिक स्तरावरील एक अग्रणी औषधी रसायन उत्पादक तसेच ऑईलवेल कम्प्लीशन रसायनांमधील भारतातील एक अग्रणी उत्पादक आहे.  कंपनी एचएमडीएस आणि सीएमआयसी यासारख्या प्रामुख्याने औषध उद्योगात (‘फार्मास्युटिकल केमिकल्स’) आणि कॅल्शियम ब्रोमाईड, झिंक ब्रोमाईड आणि सोडियम ब्रोमाईड यासारख्या  प्रामुख्याने ऑईलफिल्ड्स उद्योगात (‘ऑईलवेल कम्प्लीशन केमिकल्स’) कम्प्लीशन फ्ल्युईड्स म्हणून वापरण्यात येणाऱ्या अजैविक ब्रोमाईड्ससारख्या विशेष प्रकारच्या रसायनांची उत्पादक कंपनी आहे.  कंपनीचे उत्पादन केंद्र गुजरातमधील वडोदराजवळील मंजुसार येथे सुमारे 29,000 चौरस मीटरवर पसरलेले आहे.  त्यांचे कॉर्पोरेट कार्यालय वडोदरा येथे असून विक्री आणि विपणन कार्यालये हैदराबाद आणि मोहाली येथे आहेत.  उत्पादन केंद्रात सध्या सात वैयक्तिक कार्यान्वित प्लान्ट्स असून (‘ऑपरेशनल प्लान्ट्स’) प्रत्येक प्लान्ट हा कंपनीच्या  विशिष्ट उत्पादनासाठीच राखीव आहे.  जुलै 31, 2020 रोजी या सात कार्यान्वित प्लान्ट्सची अकारमानात्मक अणुभट्टी क्षमता 374.85 केएल इतकी होती.  उत्पादन या निकषावर 2019 या कॅलेंडर वर्षातील  एचएमडीएसचे उत्पादन करणारी ही भारतातील एकमेव कंपनी होती आणि एचएमडीएसचे उत्पादन करणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी होती. (स्रोत: फ्रॉस्ट अँड सुल्लीवन अहवाल).  उत्पादन आणि क्षमता या निकषावर 2019 या कॅलेंडर वर्षातील सीएमआयसीचे उत्पादन करणारी ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि सीएमआयसीच्या उत्पादनातील जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. (स्रोत: फ्रॉस्ट अँड सुल्लीवन अहवाल).  याखेरीज, उत्पादन निकषावर 2019 या कॅलेंडर वर्षात भारतात जिंक ब्रोमाईडचे उत्पादन करणारी ही एकमेव कंपनी आहे आणि कॅल्शियम ब्रोमाईडचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.  (स्रोत: फ्रॉस्ट अँड सुल्लीवन अहवाल).          

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO