कॅडीने घातलाय साडी नेसायचा घाट

 

झी युवावरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण  ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. आणि आता यात भर पडलीये ती कॅडी म्हणजेच कादंबरीची.

कॅडी ही नचिकेतची खास मैत्रिण थेट ऑस्ट्रेलियाहून मुंबईमध्ये आली आणि ती काही ना काही कारणाने सध्या घरातल्या सर्वांच्याच चर्चेचं केंद्रस्थान बनतेय. असं असलं तरी कॅडीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरुये असं दिसतंय. नचिकेतचं लक्ष स्वतःवर रोखून ठेवायला ती सध्या प्रयत्न करतेय. सई आणि नचिकेत यांच्यात काही तरी खिचडी शिजतेय असा संशय तिला आहे ज्यासाठी नवनव्या उठाठेवीही तिने सुरु केल्यात. यातच तिला साडी नेसायची इच्छा होते ज्यासाठी नचिकेत सईला तिला मदत करायला सांगतो. सईही तिला सुंदर साडी नेसवून देते खरी, मात्र कॅडी सईच्या या मदतीचा मोबदला म्हणून तिला चक्क पैसे देऊ करते ज्यामुळे सई नचिकेत काहीसे खट्टू होतात.

कॅडीच्या यावागण्यामागे नक्की काय हेतू आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरणारे त्यामुळे पहायला विसरु नका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका दररोज रात्री ८ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable