संगीतक्षेत्रातील महिलांना प्रेरणा देण्यासाठी, सबलीकरण करण्यासाठी आणि संगीत क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यासाठी
इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी लिमिटेड (आयपीआरएस)ची डॉल्बी आणि हंगामा आर्टिस्ट अलाउड समवेत भागीदारी
भारत, 2 मार्च 2021 : महिलांचे संगीत उद्योगामध्ये सबलीकरण करण्यासाठी द इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी लिमिटेड (IPRS) या संगीतकार, गीतकार आणि संगीत प्रकाशकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने डॉल्बी लॅबॉरेटरीज (इमर्सिव्ह मनोरंजन प्रदान करण्यात आघाडीवर असलेले) आणि हंगामा आर्टिस्ट अलाउड (टॅलेंट व स्वतंत्र कंटेन्टसाठीचा प्लॅटफॉर्म) यांच्या सहयोगाने #HERmusic या उपक्रमाची घोषणा केली. संभाव्य अडथळे ओळखणे, अभिव्यक्त होण्यासाठी व भरभराटीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे या बाबतीत भारतातील महिला संगीतकारांना प्रोत्साहन देणे हे या असोसिएशनचे उद्दिष्ट आहे. एकत्रितपणे ते या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजी #HERmusic च्या छत्रांतर्गत अनेक उपक्रम सुरू करणार आहेत. हे उपक्रम पुढे जाऊन #UnleashHERmusic, #EmpowerHERmusic, आणि #CelebrateHERmusic अशा तीन चरणांच्या कॅम्पेनमध्ये राबविण्यात येणार आहे.
#UnleashHERMusic या पहिल्या चरणामध्ये ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी सामूहिक सांगीतिक गोलमेज परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत संगीतनिर्मात्या, संगीतकार, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांचे पॅनल आहे. या पॅनलमध्ये स्नेहा खानवलकर (संगीतकार), अनुष्का मनचंदा (गायिका, संगीतकार, संगीत निर्माती), एम. एम. श्रीलेखा (गायक आणि संगीतकार), नतानिया लालवानी (इंडि-पॉप म्युझिशिअन), हिरल विरादिया (साउंड इंजिनीअर), अन्वेषा दत्ता गुप्ता (गायिका आणि कम्पोझर), सौमिनी श्रीधरा पॉल (वरिष्ठ उपाध्यक्ष, हंगामा आर्टिस्ट अलाउड), सोनाली सिंग (टॅलेंट मॅनेजर), त्याचप्रमाणे या सत्राचे संचालन करणाऱ्या निर्मिका सिंग (संपादक, रोलिंग स्टोन) यांचा समावेश आहे. #EmpowerHERMusic हा या कॅम्पेनचा दुसरा उपक्रम आहे आणि यात डॉल्बी, हंगामा आर्टिस्ट अलाउड आणि या उद्योगक्षेत्रातील दिग्गजांच्या साथीने व्यापक प्रमाणावर आवाका वाढविणे, टॅलेंट हंट आणि नॉलेज सीरीज राबविण्यात येईल. यात महिला कलाकारांना कल्पकतेची तंत्रे शिकण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कलाप्रकारात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुधारणा करता येईल, ज्यायोगे कलाकार/क्रिएटर्स यांना आपल्या कल्पकतेचा पैस वाढवण्यास मदत होईल. #CelebrateHERMUSIC हा या कॅम्पेनचा तिसरा चरण असून या औचित्याने ‘हर क्रिएशन’ (‘ती’ची निर्मिती) ‘फक्त महिलांचा सहभगा असलेल्या म्युझिक कॉन्सर्ट’च्या रूपाने सादर करण्यात येईल आणि या क्षेत्रातील महिलांची प्रशंसा आणि आठवणी जागविण्यात येतील. ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच कॉन्सर्ट असणार आहे.
आंतरराष्ट्रीय कला, सामूहिक FEMWAV ने २०१६ ते २०१८ या कालावधीत केलेल्या अभ्यासातील आकडेवारीनुसार महिला कम्पोझर्स आणि निर्मात्यांचे पुरुष कम्पोझर्स व निर्मात्यांशी असलेले प्रमाण १:८० इतके आहे. इंडियन इंडि फ्रंटनुसार (२०१५ ते२०१८) हे प्रमाण १:७१ आहे. व्यवस्थापनाच्या आघाडीवर हे प्रमाण नगण्यच आहे. एकूर्ण आर्टिस्ट मॅनेजर्सपैकी महिलांचे प्रमाण केवळ १०% आहे. महिलांची संख्या कमी असलेली प्रोडक्शन व संगीत निर्मिती ही दोनच क्षेत्रे नाहीत. निर्णयकर्ते, प्रकाशक, टॅलेंट मॅनेजर्स, वादक, A&R, साउंड इंजिनीअर्स, डीजे आणि संगीत क्षेत्रातील इतर विभागांमध्येही महिलांचे प्रमाण अत्यंत तुरळक आहे. म्हणूनच या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि भारतातील संगीतक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आयपीआरएस, हंगामा आर्टिस्ट अलाउड आणि डॉल्बी लॅबोरेटरीज एकत्रित आले.
या उपक्रमांबद्दल आयपीआरएसचे सीईओ श्री. राकेश निगम म्हणाले, “आयपीआरएस, डॉल्बी लॅबोरेटरीज आणि हंगामा आर्टिस्ट अलाउड यांच्या सहयोगामुळे आम्ही खूप रोमांचित झालो आहोत. विविध उद्योगक्षेत्रांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असले तरी भारतातील संगीतक्षेत्रात महिला लेखिका आणि कम्पोझर्सचे योगदान तुलनेने कमीच आहे. म्युझिक क्रिएशन आणि प्रोडक्शन या क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व फार मोठ्या कालावधीपासून खूपच तोकडे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या विषयाला वाचा फुटेल आणि या क्षेत्रात आवश्यक असलेले बदल घडतील आणि या क्षेत्रात पूर्वी ज्या संधी महिलांना उपलब्ध नव्हत्या, त्या होतील, अशी आम्हाला आशा आहे. या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेल्या समस्यांचे निराकरण करून आणि क्रिएटिव्ह व गुणवान कलाकारांना वाव देण्याचा आमचा संयुक्त प्रयत्न असेल. परिणामी, आपल्या देशातील सांस्कृतिक वारसा अधिकच समृद्ध होईल.”
हंगामा आर्टिस्ट अलाउडच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सौमिनी श्रीधरा पॉल म्हणाल्या, “आधुनिक संगीत उद्योगक्षेत्रात स्थान प्राप्त करण्यामध्ये महिलांना जो संघर्ष करावा लागतो, त्या विषयांवर चर्चा करण्यासाठी खुला मंच तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा संयुक्त उपक्रम एक निश्चित आकार घेत आहे, हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. या आवश्यक बदलाची फळे संगीतक्षेत्राला चाखायला मिळतील, आणि आपला वारसा पुढे नेण्यासाठी आपण लैंगिकदृष्ट्या तटस्थपणे काम करणारे कार्यक्षेत्र आपण घडवू शकतो, अशी आम्हाला आशा आहे. अत्यंत विलंबाने होत असलेल्या या चर्चेसाठी हे उपक्रम म्हणजे पहिले पाऊल ठरावे अशी आमची इच्छा आहे.”
महिला गीतकार आणि निर्मात्यांची कमतरता ही एक प्रकारची साथच आहे. या व्यवसायात अमूलाग्र बदल होणे आणि मोठ्या संख्येने महिला संगीतकर्त्यांच्या सहभागासाठी वाट तयार होणे अत्यावश्यक आहे. महिलांना आपली कला उचलून धण्यासाठी आणि त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी अनुकूल, सहयोगात्मक वातावरण तयार करणे हा या चळवळीचा उद्देश आहे. ही अशी जागा असेल जी संगीतक्षेत्रातील महिलांना प्रेरणा देईल, त्यांचे सबलीकरण करेल आणि त्यांचे अस्तित्व साजरे करेल.
Comments
Post a Comment