आत्मनिर्भर इंडिया / स्कील इंडिया

सर्वोच्च एएमसीं’ची NSE आणि CIEL समवेत हातमिळवणी, 

आगामी 3 वर्षांत 50,000 हून अधिक नवीन म्युच्युअल फंड वितरक तयार करणार    

ExpertMFD हा भारतातील पहिला सहयोगी उपक्रम असून मोठ्या एएमसी एकत्र येऊन वेगवान वित्तीय वितरक रचना तयार करून नवीन वित्तीय उद्योजक तयार करण्यात योगदान देतात

·     आगामी दशकात रु. 100 लाख कोटींची उलाढाल करण्याचे भारतीय म्युच्युअल फंड उद्योग क्षेत्राचे उद्दिष्ट असून सध्या प्रत्येकी 17,000 व्यक्तींकरिता केवळ 1 वितरक असून, संधीकडे अंगुलीनिर्देश आहे

·     यामुळे लहान शहरांत स्वयं-रोजगार संधींची निर्मिती होईल, इन्शुरन्स एजंट, निवृत्त बीएफएसआय व्यावसायिक, गृहिणी, बीएफएसआय कर्मचारी, पदवीधर त्याचप्रमाणे स्वतंत्र वित्तीय वितरक होऊ पाहणाऱ्या अनेकांना कौशल्य प्राप्त होऊन, सर्वसमावेशक पाठबळ लाभेल

·      (सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग) मध्ये यशस्वी होण्यासाठी नियामक प्रशिक्षण आणि व्यवहारीक अभ्यास साह्य आवश्यक ठरते, गरजेचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच व्यवसायात डिजीटल मदतीसाठी एनएसई ट्रान्झॅक्शन पार्टनर राहील.

मंगळवार, 16 मार्च, 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय उद्योजकांना कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यादिशेने असेट मॅनेजमेंट कंपन्यांनी एनएसई आणि सीआयईएल सोबत एकत्रित हातमिळवणी करत 50,000 नवीन इंडस्ट्री म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स/ (वित्तीय उद्योजक) आगामी 3 वर्षांत उभारायचे ध्येय समोर ठेवले आहे.

हा उपक्रम ExpertMFD (www.expertmfd.com), संपूर्ण भारताचा पहिला-वहिला, एकत्रित प्रयोग आहे, ज्यामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधील एकंदर 2/3 एयुएम व्यवस्थापन करण्याच्या सर्वोच्च एएमसींचा समावेश आहे. यामध्ये अग्रगण्य आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, एलअँडटी एमएफ, निप्पॉन इंडिया एमएफ, एसबीआय एमएफ आणि सुंदरम एमएफ यांनी एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) आणि सीआयईएल (सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग) सोबत हातमिळवणी केली आहे.

नवीन भारत कमावता आहे, तो गुंतवणूक करू लागला आहे. पद्धतशीर आर्थिक नियोजनाद्वारे बाजाराशी निगडीत परतावा मिळवणे तसेच पुंजीला आर्थिक पुरवठा करण्यात म्युच्युअल फंडाचा एक आकर्षक पर्याय म्हणून उगम होत आहे. नवीन म्युच्युअल गुंतवणूकदार असो किंवा अनुभवी गुंतवणूकदार; दोघांसाठी मार्गदर्शन आणि पाठींबा आवश्यकच ठरतो. आगामी दशकभरात भारतीय म्युच्युअल फंड उद्योग रु 100 लाख कोटींचा होईल. तरीच, सध्या प्रत्येकी 17,000 लोकांकरिता केवळ 1 वितरक आहे, इन्शुरन्स एजंट, निवृत्त बीएफएसआय व्यावसायिक, गृहिणी, बीएफएसआय कर्मचारी, विद्यार्थी इत्यादींकरिता वाढीची मोठी संधी आहे. सर्वोच्च वैयक्तिक म्युच्युअल फंड वितरक वर्षाला रु. 1 कोटींचे निव्वळ वार्षिक कमिशन कमाऊ शकतात. याचा अर्थ हा पर्याय खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणारा असल्याचे आढळते.

ExpertMFD च्या वतीने भारतात पहिल्यांदाच वित्तीय उद्योजक / म्युच्युअल फंड वितरक यांच्याकरिता सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उभारणीसाठी अभिनव स्वरूपाचा सहयोगी मंच तयार करण्यात आला. याद्वारे ज्यांना तज्ज्ञ वित्तीय वितरक बनायचे आहे, अशा व्यक्तींना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नियामक प्रशिक्षणासोबतच तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यावहारिक मार्गदर्शन तसेच प्रेरणा उपलब्ध करून देण्यात येते आहे. जेणेकरून म्युच्युअल फंड उद्योगात एक यशस्वी तज्ज्ञ होण्याची संधी मिळेल. व्यवसाय चालविण्याकरिता सुरळीत डिजीटल अनुभवाकरिता एनएसई हा ट्रान्झॅक्शन पार्टनर असणार आहे.   

कोट्स खालीलप्रमाणे

1 याप्रसंगी बोलताना CIEL चे एमडी हिमांशू व्यापक म्हणाले की, “आमच्याकडे भारतात सुमारे 2.3 कोटी अभिनव एमएफ गुंतवणूकदार आहेत. एमएफ वितरकांची वाढ एमएफ उद्योगातील मालमत्तेच्या वाढीशी कायम राहिली नाही. ज्यांना तज्ज्ञ वित्तीय वितरक होण्याची  इच्छा आहे, अशा सर्वांसाठी संपूर्ण स्टॅक एंड टू-एंड प्लॅटफॉर्म प्रदान करून भविष्यातील आर्थिक तज्ज्ञांसाठी एक मजबूत पाया आणि एक टप्प्या-टप्प्याने वाढीचे वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप आणि मजबूत भागीदारीच्या माध्यमातून हे केले जाते. या मंचाद्वारे वितरकांना दुसर्‍या टप्प्यात अन्य वित्तीय उत्पादनांवर प्रशिक्षण देईल.”

2 NSE इंडिसेस लिमिटेड – एनएसईचे सीईओ मुकेश अगरवाल म्हणाले की,  “आम्हाला एनएसई’मध्ये ExpertMFD समवेत एकत्रित भागीदारी करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो. सर्वोच्च AMC तसेच CIEL समवेत रणनीतीत्मक भागीदारीने भारतीयांसमोर मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड वितरणाच्या अभिनव संधी खुल्या होणार आहेत. एनएसई कायमच तंत्रज्ञानविषयक कल्पकतेत अग्रेसर असून गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करत आली आहे.  उद्योग क्षेत्रात हा पहिलाच मंच इन्शुरन्स एजंट, गृहिणी, विद्यार्थी, निवृत्त व्यावसायिक इत्यादी कोणालाही सर्वोच्च संधी उपलब्ध करून देणार आहे. आमचे एकत्रित ज्ञान, व्यवसायिक हुशारी, कौशल्यपूर्ण क्षमता आणि व्यवहार इंजिन कोणत्याही नव्या वितरकाला एकाच मंचावर नवीन व्यावसायिक संधींच्या प्रवासात सहभागी करून घेण्यास साह्य करणार आहे.”

3 एएमसींचे सीईओ: आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड, एक्सिस एमएफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, एल अँड टी एमएफ, निप्पॉन इंडिया एमएफ, एसबीआय एमएफ, सुंदरम एमएफ या सर्वोच्च एएमसींनी संघटितपणे दिलेल्या विधानात नमूद केले आहे की, “म्युच्युअल फंड उद्योगासाठी वित्तीय उद्योजकांकरिता ExpertMFD मंच लॉन्च करण्याच्या उद्देशाने NSE तसेच CIEL सोबतच्या भागीदारीचा आनंद वाटतो. हे उद्योग क्षेत्र आगामी काळातील वृद्धीसाठी सज्ज झाले आहे. पुढील 10 वर्षांत रु. 100 लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. भारतीय मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम स्वत:कडे साठविण्याऐवजी आर्थिक उत्पादनांत गुंतवण्याच्या दिशेने प्राधान्य देताना दिसत आहेत. अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी वितरकांचे जाळे कमी पडते. त्यामुळे या उद्योग क्षेत्रात नवीन वित्तीय वितरकांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. ज्या परिणामकारक ठरतील. आपण वितरकांचे जाळे विस्तारण्याच्या दिशेने कसे काम करतो आणि ग्रामीण भारताकडे कसे वळतो, यामध्ये उद्योगाचे यश अवलंबून आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आमचे वर्षानुवर्षे संपादित केलेले ज्ञान उपयुक्त ठरेल. आम्हाला हे शिक्षण आणि अनुभव या कामी लावायचा आहे.” 

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार