ऑनफील्ड
ऑनफील्ड कामे अखंडितपणे होण्यासाठी क्विक्सीने आपल्या पुरस्कार विजेत्या नो-कोड प्लॅटफॉर्मवरून मोबाइल ॲप्सना देऊ केली ऑफलाइन कार्यरत राहण्याची क्षमता
~ ऑन-फील्ड कर्मचा-यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी अगदीच कमी असलेल्या किंवा जराही नसलेल्या ठिकाणीही विनासायास काम करण्यास मदत करणारे आगळेवेगळे वैशिष्ट्य ~
Mumbai, 20th May 2021: क्विक्सी (Quixy) नो-कोड बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन आणि ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मने मोबाइल ॲप्लिकेशन्स ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मोड्समध्ये अखंडितपणे कार्यरत रहावीत यासाठी त्यांना ऑफलाइन चालू राहण्याची क्षमता बहाल करणारी यंत्रणा सुरू केली आहे. अनेकदा, अनेक ठिकाणी सातत्याने इंटरनेट कनेक्शन सुरू राहीलच याची हमी देता येत नाही. बांधकामाच्या जागा, प्रत्यक्ष स्थळी जाऊन काम करणारे सरकारी कर्मचारी, अंडरग्राऊंड कामे, समुद्रात असलेल्या तेलविहिरी, हॉस्पिटल्स किंवा ग्रामीण/दुर्गम भागात चालणारी कामे ही अशा प्रसंगांची काही उदाहरणे आहेत. अशा ठिकाणी काम करणा-या लोकांना ऑनलाइन सेवा मिळू शकत नाही.
क्विक्सी नो-कोड प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये
|
गेल्या वर्षभरामध्ये महामारीच्या परिस्थितीमुळे डिजिटल उपाययोजनांची गरज प्रचंड वाढली आहे. पारंपरिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी वेळ आणि भांडवल या दोन्ही गोष्टी लागतात आणि तयार बनावटीची सॉफ्टवेअर्स विविध व्यापारी आस्थापनांच्या विशिष्ट गरजा भागवू शकत नाहीत. अशावेळी नो-कोड ॲप डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म्स कोडिंगशिवायच ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या डिजिटल उपाययोजनांची गरज आणि उपलब्धता यांतील दरी भरून काढण्याचे काम करत आहेत. अगदी सहजसोपी ‘ड्रॅग-अँड-ड्रॉप’ वैशिष्ट्ये वापरून तंत्रज्ञानाचा काहीच संबंध नसलेल्या व्यवसायांमधील व्यक्तीही आपल्या गरजांबरहुकुम आपली स्वत:ची बिझनेस ॲप्लिकेशन्स विकसित करू शकतात. प्रोग्रामिंग येत नसलेल्यांनाही ही ॲप्लिकेशन्स तयार करण्याच्या कामी मदत करण्यासाठी क्विक्सीकडून वैशिष्ट्यपूर्ण दृश्य साधनांचा वापर केला जातो.
क्विक्सी वेगाने विस्तारत असलेली कंपनी आहे आणि हा मंच सध्या पंधराहून अधिक उद्योगक्षेत्रांमधील जगभरात विखुरलेल्या ग्राहकांना सेवा देत आहे, ज्यातील प्रत्येक ग्राहकाची गरज आणि उपयोजन वेगवेगळे आहे.
“तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अलिकडे झालेल्या बदलांमुळे नो-कोड प्लॅटफॉर्म्सच्या भरभराटीला वाव दिला आहे. आता संस्थांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कामासाठी प्रचंड भांडवलाची गुंतवणूक करण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांना क्विक्सीसारख्या नो-कोड सेवा वापरता येतील.” क्विक्सीचे संस्थापक आणि सीईओ गौतम निमगड्डा म्हणाले. “क्विक्सीच्या मंचाद्वारे विकसित करण्यात आलेल्या यंत्रणेमध्ये ऑफलाइन काम करण्याची क्षमता तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे काम करण्याची लवचिकताही आहे. हे वैशिष्ट्य ही आमच्या सक्षम टीमच्या तांत्रिक प्रभुत्वाचे द्योतक आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमच्या नो-कोड प्लॅटफॉर्मवर काही लक्षणीय वैशिष्ट्ये नव्याने दाखल केली आहेत. यात यूजर्सना अधिक चांगला अनुभव देऊ करण्यासाठी आधीच्या आवृत्तींच्या तुलनेत कामाचा वेग तिपटीने वाढविण्यात आला आहे आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मसाठीच्या इंटरफेसमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.”
कंपनीच्या स्थापनेपासून दोन वर्षांमध्येच क्विक्सीने बरेचसे उल्लेखनीय मानसन्मान मिळविले आहेत. एंटरप्राइज लो-कोड अॅप्लिकेशन्ससाठीच्या गार्टनर पीअर इनसाइट्स “व्हॉइस ऑफ कस्टमर“ रिपोर्टमध्ये तिचा उल्लेख आला आहे, G2 च्या स्प्रिंग २०२१ अंकामध्ये कंपनीला ‘लीडर फॉर नॉन-कोड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट’ म्हणून मानांकन देण्यात आले आहे; फॉरेस्टर्सच्या २०२१ मधील पहिल्या तिमाहीतील ‘नाऊ टेक’ अहवालामध्ये ‘जनरल पर्पज लो-कोड डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म्स’च्या यादीत तिचे नाव आले आहे, याखेरीज या क्षेत्रातील सेवांची समीक्षा करणा-यांनी कंपनीला गुंतवणूकीवर सर्वोत्तम परतावा मिळवणारी कंपनी, वापराला सर्वात सोपा मंच, सर्वात सोपे सेटअप, सर्वोत्तम सपोर्ट आणि सर्वोत्तम परिणाम यांच्यासह अनेक चांगली बिरूदे बहाल केली आहेत.
या मंचाला ISO 27001 आणि SOC 2 Type 2 प्रमाणपत्रे प्राप्त आहेत.

Comments
Post a Comment