झी मराठी वर "हे तर काहीच नाय!"
सिद्धार्थ जाधव ऑल टाइम विशेष अतिथी 'हे तर काहीच नाय' वर
झी मराठी आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी नेहमीच सज्ज असते म्हणूनच आता झी मराठीने आपली कंबर पुन्हा कसली आहे आणि ‘हे तर काहीच नाय' या नवीन कार्यक्रमचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन अनेक कलाकारांनी मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना हसवण्याचा विडा देखील उचलला आहे. येथे कलाकार आपल्या आयुष्यातील काही मजेशीर किस्स्यांचा फड रंगवून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. स्टॅन्ड-अप कॉमेडीच स्वरूप असलेल्या ह्या कार्यक्रमाला मनोरंजनाचा चार चांद जोडण्यासाठी मराठी कलाविश्वातील ऑल टाईम आवडता आणि दिलखुलास अभिनेता सिद्धार्थ जाधव विशेष अतिथीच्या भूमिकेत ह्या शोच्या प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्या सोबत असणार आहेत. तर आपल्या ह्या विशेष अतिथीला सोबत होणार आहे ती म्हणजे सैराट फेम तानाजी गलगुंड ह्यांची. हा कार्यक्रम डॉ. निलेश साबळे दिग्दर्शित असल्या कारणाने मनोरंजनाची तुफान मस्ती होणारच ह्यात काही शंका नाही.
तेव्हा तयार राहा प्रेक्षकहो "हे तर काहीच नाय!" पाहायला, १० डिसेंबर पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठी वर.
Comments
Post a Comment