स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड

सीएसआरमध्ये  स्टरलाइट पॉवरच्या ईडीइंडिया(Edindia) फाउंडेशनने  आशियाई पॉवर पुरस्कार २०२१ जिंकला
स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशन  लिमिटेड (स्टरलाइट पॉवर) या  आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील पॉवर ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर आणि सोल्यूशन्स याची सेवा देणाऱ्या  कंपनीला २०२१ चा एशियन पॉवर अवॉर्ड्स पुरस्कार मिळाला आहे.

स्टरलाइट पॉवरला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर - इंडिया' या श्रेणीमध्ये त्याच्या उपकंपनी, स्टरलाइट ईडीइंडिया फाऊंडेशनच्या कार्याला या पुरस्काद्वारे गौरवण्यात आले. महामारी दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड  या राज्यांमधील २ लाखांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. 

स्टरलाइट ईडीइंडिया फाउंडेशन ही संस्था स्टरलाइट पॉवर आणि त्याच्या उपकंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवा करते. एशियन पॉवर अवॉर्ड्स आशियातील ऊर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक उपक्रमांची नोंद सामाजीक स्तरावर नोदंवतात. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ