मुथूट्टु मिनि फायनान्सर्स
मुथूट्टु मिनि फायनान्सर्सचा एनसीडी पब्लिक इश्यु खुला,
एनसीडीसाठी विविध पर्यायांतर्गत वार्षिक परतावा 8.84% ते 10.20% पर्यंत मिळू शकेल
•प्रत्येक रु.1,000 दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड एनसीडींचा इश्यु.
•या एनसीडी इश्युचा आधारभूत इश्यु आकार रु. 100 कोटी इतका आहे, ज्यात एनसीडी राखून ठेवण्याचा पर्याय समाविष्ट आहे ज्यात रु.100 कोटींपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन करण्याचा पर्याय खुला आहे.
•दर्शनी मूल्या आणि इश्युची किंमत रु.1,000 प्रति एनसीडी
•एनसीडी इश्युला केअर रेटिंग्ज लिमिटेडकडून 'CARE BBB+' : स्थिर (ट्रिपल बी; आउटलूक : स्टेबल) मानांकन मिळाले आहे.
•15 वा एनसीडी इश्यु 1 डिसेंबर 2021 रोजी खुला झाला आणि 28 सप्टेंबर 2021 रोजी बंद करण्याचे नियोजित आहे.
•एनसीडी बीएसई लिमिटेडमध्ये सूचिबद्ध होण्याचे प्रस्तावित आहे.
मुंबई/कोची, 2 डिसेंबर 2021 : मुथूट्टु मिनि फायनान्सर्स लि.ची (“मुथूट्टु मिनि”/‘एमएमएफएल’) स्थापना 1998 साली झाली. ही कंपनी सुवर्ण कर्ज क्षेत्रामध्ये डिपॉझिट न घेणारी सिस्टेमिकली इम्पॉर्टंट एनबीएफसी असून घरगुती सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज देण्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या कंपनीतर्फे प्रत्येक रु.1,000 दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड, रीडिमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या इश्युची घोषणा करण्यात आली. या इश्युचे एकूण मूल्य रु.200 कोटींपर्यंत असणार आहे. हा इश्यु आता खुला आहे आणि 28 डिसेंबर 2021 रोजी तो बंद होणार आहे.
एनसीडी इश्युचे एकूण मूल्य रु. 100 कोटी इतके आहे. यात रु.100 कोटींपर्यंतचे ओव्हर-सबस्क्रिप्शन राखण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या एनसीडीच्या इश्युसाठी नियुक्त स्टॉक एक्स्चेंज म्हणून बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. एनसीडी इश्युला केअर रेटिंग्ज लिमिटेडकडून (केअर रेटिंग्ज) 'CARE BBB+' : स्थिर (ट्रिपल बी; आउटलूक : स्टेबल) मानांकन मिळाले आहे.
30 सप्टेंबर 2021 रोजी एमएमएफएलकडे 3,95,175 सुवर्ण कर्ज खाती होती. यापैकी बुहतांश खाती ग्रामीण आणि निमशहरी भागांतून होती. त्यांचे एकूण मूल्य 2,033.66 कोटी होते. त्यांच्यातर्फे देण्यात आलेल्या एकूण कर्जापैकी आणि अॅडव्हान्सेसपैकी हा वाटा एकूण 97. 41% आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांतील परतावा 30 सप्टेंबर 2021 रोजी 19.39% होता. आर्थिक वर्ष 2021साठी त्यांचे निव्वळ नॉन-परफॉर्मिंग असेट्स 0.75% होते, जे आर्थिक वर्ष 2019मध्ये 1.39% होते.
सोन्यावरील कर्जाच्या व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्यातर्फे मायक्रो-फायनान्स लोन, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, मनी ट्रान्सफर, इन्श्युरन्स ब्रोकिंग, पॅन कार्डशी संबंधित आणि ट्रॅव्हल एजन्सी सेवा प्रदान करण्यात येतात.
निनन मथाई मुथुट्टू यांनी 1887 साली या कौटुंबिक व्यवसायाची स्थापना केली. आता या कंपनीचे नेतृत्व अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक निझी मॅथ्यू आणि व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मुथुट्टू यांच्या हाती आहे.
या इश्युसाठी विवरो फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड एकमेव लीड मॅनेजर्स आहेत, या इश्युसाठी मिटकॉन ट्रस्टीशिप लिमिटेड डेबेंचर ट्रस्टी आहेत आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्युसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.
या इश्युमधून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग ऑनवर्ड लेंडिंग, फायनान्सिंग आणि कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलीची व व्याजाची परतफेड/प्रिपेमेंट (किमान 75%) आणि उरलेल्या निधीचा वापर (25%पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येईल.
सिक्युअर्ड एनसीडीअंतर्गत पर्याय I ते VI इश्युसाठीच्या प्रत्येक पर्यायाच्या अटी खाली नमूद केल्या आहेत:
Comments
Post a Comment