बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 57 !
गायत्री उत्कर्षबद्दल नक्की काय सांगू पहाते,
मुंबई ७ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार्या नॉमिनेशन कार्यामध्ये TOP 8 सदस्यांना घरात आलेल्या नव्या सदस्यांना हे पटवून द्यायचे आहे की का ते घरात रहाण्यास पात्र आहेत आणि दूसरा सदस्य अपात्र आहे. आणि त्यासाठीच आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. सदस्य त्यांचा मुद्दा पटवून देताना दिसणार आहेत. विशालने ज्याप्रमाणे त्याचे मीराबद्दलचे मत स्नेहासमोर मांडले त्याचप्रमाणे गायत्री तिचा मुद्दा तृप्ती ताईंना सांगताना दिसणार आहे.
गायत्रीचे म्हणणे आहे, उत्कर्ष खरंतर चांगले आहेत, चांगले प्लेयर आहेत. फक्त त्यांच्या काहीकाही गोष्टी आहेत ज्या खटकतात. एक म्हणजे चांगले असून ते काही लोकांबरोबर खेळून उगाचंच त्यांच्या मागेमागे जाऊन स्वत:पण नेगेटिव्ह लाईटमध्ये येतात. सरदेखील म्हणाले घरात बुगुबुगू तर उत्कर्षच आहेत. कारण, मीरा बरोबर राहून काय होतं ते मला चांगलंच माहिती आहे, तेच त्यांच्याबरोबर आता होतं आहे माझ्या मते त्याच्यामधून त्यांना जागं करण्यासाठी हे करू नको... तसं नाही केल तर आतापर्यंत जे कामावलं आहे ते गमावशील... असं मला कुठेतरी वाटतं...
Comments
Post a Comment