बिग बॉस मराठी सिझन तिसरा
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 57 !
...याचा प्रयत्न काही संपता संपेना !
जयचे स्नेहाला वचन...
मुंबई ७ डिसेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल तीन नव्या सदस्यांची एंट्री झाली. तृप्ती देसाईंनी विशाल, मीरा, मीनल यांचे भरभरून कौतुक केले आणि Looser हे लॉकेट सोनालीला दिले तर आदिशने देखील त्याला काय वाटते आहे ते सदस्यांना सांगून मीराला Looser हे लॉकेट दिले. घरामध्ये स्नेहाचे मात्र वेगळेच रूप बघायला मिळाले. घरातील काही सदस्यांना तो performance वाटला खरा पण, तिच्या वागण्याने आणि बोलण्याने घरातील एक व्यक्ति खूप दुखावली गेली जी तिच्या अत्यंत जवळची होती आणि तीव्यक्ति म्हणजे जय दुधाणे. त्या व्यक्तिला स्नेहाने Looser हे लॉकेट देखील दिले. त्यांच्या मैत्रीचा त्याने फायदा घेतला, तिच्यामागे त्याने तिच्याबद्दल बरेच काही बोले आहे अश्या अनेक गोष्टी तिने जयबाबतीत बोल्या आणि या सगळ्यात एक मैत्रीण गमावून बसलास असे देखील खडसावून सांगितले. आणि तेव्हापासून ही गोष्ट जयच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याचे म्हणणे आहे काही गोष्ट मी नाही बोलो आणि काही गोष्टी मला बोलाव्या लागल्या... माझे दोन चेहरे नक्कीच आहेत पण... आणि बरंच काही संभाषण या दोघांमध्ये काल बघायला मिळाले. पण, या सगळ्यात स्नेहा तिच्या मतावर ठाम असल्याचे दिसून आले.
आज जय स्नेहासमोर माफी मागताना दिसणार आहे. तिच्यासमोर विनवणी करताना दिसणार आहे. त्याचा हा प्रयत्न काही संपता संपेना असं चित्रा कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे. जयचे म्हणणे आहे, एक गोष्ट लक्षात ठेव जे काही केलं ते खरंच मनापासून केलं. माझं काहीच intension नव्हतं तुला हर्ट करायचं, किंवा तुला खाली दाखवायचे, किंवा तुला बाहेर काढण्याचं, खरंच तुला जे वाटतं आहे ना जे काही तू बोलीस... and I am sorry … स्नेहाचे म्हणणे आहे, जर तुम्हांला वाटतं नाही तुमचं चुकलं आहे तर सॉरी बोलून काय उपयोग आहे? स्नेहाच्या म्हणण्यानंतर सुध्दा जयने तिची माफी मागितली. स्नेहाचे म्हणणे आहे जय जे काही बोलला आहे ते नॅशनल टेलिव्हीजनवर आहे. जयने स्नेहाला प्रॉमिस केले, की तो तिला कधी irritate नाही करणार ...
बघूया या दोघांमध्ये मैत्री पुन्हा एकदा होणार की नाही? बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Comments
Post a Comment