टकाटक' चित्रपटाचे त्रिवर्षपूर्ती ग्रॅड सेलिब्रेशन
'टकाटक' चं त्रिवर्षपूर्ती ग्रॅड सेलिब्रेशन २८ जून २०१९ ही तारीख मराठी सिनेरसिकांना नक्कीच आठवत असेल. २०१९ वर्षातील सहा महिने संपायला आले असतानाही जून महिना येऊनही मराठी सिनेसृष्टीच्या बॅाक्स आँफिसवर जणू दुष्काळच पडला होता. एकही चित्रपट तिकिटबारीवर कमाल दाखवू शकला नव्हता. अशा परिस्थितीत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा ॲडल्ट काॅमेडी असलेला 'टकाटक' प्रदर्शित झाला. ट्रेलर बोल्ड असल्यानं सुरुवातीला काहींनी नाकं मुरडली, पण २८ जून २०१९ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि जणू चमत्कारच झाला. ॲडल्ट काॅमेडी असूनही विनोदाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मेसेज देणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली आणि बघता बघता या चित्रपटानं बाॅक्स आँफिसवरही 'टकाटक' बिझनेस केला. या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याचं जंगी सेलिब्रेशन नुकतंच 'टकाटक'च्या टिमनं केलं. 'टकाटक'ला तीन वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निर्मात्यांकडून जंगी सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी 'टकाटक'मधील बाबूराव ठोके म्हणजेच प्रथमेश परबसह सर्व टिम...