'शाहू छत्रपती'

'शाहू छत्रपती' चित्रपटाच्या शीर्षकाचे दिमाखदार अनावरण

महाराष्ट्र ही संताचीक्रांतिवीरांचीसामाजिक उत्थानासाठी झटणा-ऱ्या सुधारकांची, मानवतेसाठी लढणाऱ्या विचारवंताची भूमी राहिलेली आहे. ज्यांनी महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजेकोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज. अशा या रयतेच्या राजाचा 'शाहू छत्रपती' हा भव्यपट २०२३ मध्ये मराठी रुपेरी पडदयावर येणार आहे.
तत्पूर्वी या चित्रपटाच्या शीर्षक अनावरणाची घोषणा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरच्या न्यू पॅलेस मध्ये महाराजांच्या वंशातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत मोठया दिमाखात करण्यात आली.
 या सोहळयाला सदर चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शाहूंचे चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवारचित्रपटाचे दिग्दर्शक वरुण सुखराजनिर्माते डॅा. विनय काटे आणि स्नेहा देसाई, आदि मान्यवर उपस्थित होते.

निर्माते डॅा. विनय काटे यांनी प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. चित्रपटाच्या निर्मीतीमागील आपले मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचे सांगतडॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राजर्षी शाहूंचा वैचारिक वारसा व इतिहास जतन करण्यासाठी हा चित्रपट खूप मोलाचा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावीअसा भविष्यवेधी विचारही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिंब्यामुळे 'शाहू छत्रपती' या चित्रपटाचा भव्य घाट घातल्याचे दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी याप्रसंगी सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला तोच सर्वोत्तमपणा या चित्रपटातून दिसेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी चित्रपटाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना नियतीनेच चित्रपटाचा हा योग घडवून आणल्याचे सांगितले. राजर्षी शाहू महाराज यांच्या गुणात्मक आयामांचा वेध आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहणार नाही तो चित्रपटातून तितकाच भव्य प्रभावीपणे मांडण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. महाराजांच्या वंशातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी चित्रपटाला शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.

राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबत इतर पाच भाषांमध्येही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. डॉ.जितेंद्र आव्हाड प्रस्तुतकर्ता असलेल्या 'शाहू छत्रपतीचित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज यांचे असणार आहे. विद्रोह फिल्म्स या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight