दातार जनेटिक्ससह अपोलो कॅन्सर सेंटरद्वारे ईझीचेक -ब्रेस्ट

दातार जनेटिक्ससह अपोलो कॅन्सर सेंटरद्वारे स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर करता यावे म्हणून एका नव्या रक्त चाचणीची सुरवात करण्यात आली

स्तनाच्या कर्करोग निदानाकरिता ईझीचेक -ब्रेस्ट हे एक मोठे तांत्रिक यश असल्याचे सांगीतले जाते आहे

भारत, जून 22,2022: कर्क रोगाच्या सेवांमध्ये सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येण्याच्या आपल्या अथक प्रयत्नांची वाटचाल पुढे नेत, खाजगी क्षेत्रात भारतातील आघाडीच्या मानल्या जाणाऱ्या अपोलो कॅन्सर सेंटर, ने दातार कॅन्सर जनेटिक्स सह एक क्रांतीकारक अशी रक्त चाचणी आणली आहे, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान हे लवकरच्या स्तरामध्ये म्हणजेच अगदी लक्षण दिसून आलेली नसताना सुद्धा अचुकतेसह जाणून घेता येणार आहे, या चाचणीमुळे योग्य वेळेला निदान झाल्यानंतर उपचार देऊन आयुष्य वाचविता येऊ शकतील. 

एकूणच स्तनाच्या कर्करोगाची वाढती संख्या आणि त्याबरोबर असलेली समाजातील मानसिकता लक्षात घेता ऑन्कोलॉजी (कर्करोगासंबंधित) विभागातील तांत्रिक आधुनिकतेमधील ही एक महत्वाची बाब समोर आलेली आहे. कर्करोगासंबंधित चर्चा या अग्रस्थानी असाव्या म्हणून, अपोलो सेंटरद्वारे महिलांना स्क्रीनिंग करण्याचे आवाहन केले जाते आहे आणि आता ते अगदी सहज शक्य आहे, एका रक्त चाचणीमधून त्यांना स्तनाच्या कर्करोगा संबंधित  असलेली संवेदनशीलता जाणून घेता येणार आहे. काही प्रमाणात रक्त काढून घेतल्यानंतर, ईझीचेक-ब्रेस्ट द्वारे पहिल्या स्तरापुर्वीच स्तनाच्या कर्करोगाचे निदान करता येऊ शकणार आहे. ईझीचेक आता भारतभरात 22 जून पासून अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये उपलब्ध होणार आहे. 

यावेळी बोलताना, अपोलो हॉस्पिटल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष, डॉ. प्रथाप रेड्डी म्हणाले, “ कर्करोगाच्या लवकर निदानासंबंधित जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाला अनुसरून आम्ही जागतिक गुणवत्ता असलेली तांत्रिक चाचणी ईझीचेक ब्रेस्ट घेऊन येत आहोत ज्यामुळे योग्य वेळेला निदानाची आणि उपचाराची हमी तर मिळेलच पण मृत्युचा दर देखील कमी होण्यास मदत मिळेल. दातार कॅन्सर जनेटिक्स सह एक महत्वाचे संशोधन हाती लागले असून अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्याकरिता जागतिक गुणवत्ता असलेली आधुनिकता आणि उपचार पद्धती उपलब्ध आहे. मी काळजी घेणाऱ्या कुटुंबियांना अशी कळकळीची विनंतीकरेन की भारतातील महिलांनी स्वत: बाहेर पडावे आणि वर्षातून एकदा स्वत:ची चाचणी करून घ्यावी, ज्यामुळे आपण कर्करोगापासून सुरक्षित असल्याची हमी मिळू शकेल. निदानापासून उपचारापर्यंत अपोलो कॅन्सर सेंटर आपल्या रूग्णासह अगदी कठीण प्रसंगी देखील उभे असेल आणि त्यांच्या आरोग्याकरिता प्रेमाने त्यांची काळजी घेत असेल याची मी खात्री देतो.”

चाचणीबद्दल बोलताना, दातार कॅन्सर जनेटिक्सचे संस्थापक आणि अध्यक्ष , श्री. राजन दातार म्हणाले, “ आपले दुर्दैव असे की, बरऱ्याचदा कर्क रोग हा उशीराच्या स्तरामध्ये गेल्यानंतरच लक्षात येतोआणि त्यामुळे अधिक जटिल आणि खर्चिक उपचाराशिवाय कोणताही पर्याय उरत नाही  त्याशिवाय दुष्परिणामांचा धोका आणि उपचाराचा अपयशाचा धोका बळावतो ते वेगळे. ईझीचेक-ब्रेस्ट हा काही वर्षांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास संशोधनाचा एक कल्पक असा विकास आहे ज्याची योग्य ती चाचणी आणि पडताळणी ही आवश्यक तेवढ्या जनमानसांमध्ये करण्यात आलेली आहे. एक साधा रक्ताचा नमुना ज्यामुळे लक्षण नसताना देखील कर्करोगाच्या निदानाची हमी मिळेल आणि यशस्वी उपचार आणि सुधारीत आयुष्याचे पर्याय उपलब्ध होऊ शकतील.” 

यावेळेला बोलताना, अपोलो हॉस्पिटल एन्टरप्रायझेस लिमिटेडच्या,ऑन्कोलॉजी आणि आंतराष्ट्रीय समूहाचे अध्यक्ष श्री. दिनेश माधवन,म्हणाले, “अपोलो कॅन्सर सेंटर आणि दातार जनेटिक्सच्या ईझीचेक ब्रेस्ट मुळे कर्करोगाचे निदान लवकर होण्यास मदत मिळणार आहे आणि हेच कर्करोगावर मात करण्याचे पहिले पाऊल असेल. भारतात स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या महिलांच्या मृत्युचे एक महत्वाचे कारण म्हणजे निदान उशीरा होणे. पण आता, त्याच्या मुळाशी आपण गेलो आहोत कारण आपल्याकडे आहे ईझीचेक ब्रेस्ट, हे आहे लवकर आणि अगदी सहज निदानाकरिता.” 

अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबईचे ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरीचे वरीष्ठ चिकित्सक, डॉ. संदिप बिप्ते यावेळी बोलताना म्हणाले, “ भारतात वाढलेली आयुष्य रेषा, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे हळू हळू  स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस वाढताना दिसून येत आहेत. स्तनाचा कर्करोग हा उपचार करता येण्यासारखा आजार आहे आणि योग्य वेळेला निदान झाल्यास जगण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे योग्य उपचार आणि चांगल्या आयुष्याकरिता लवकर निदान होणे हे फ़ार महत्वाचे आहे. ईझीचेक-ब्रेस्ट सारख्या रक्त चाचणीमुळे आपल्याला लवकरचा स्तरामध्ये कर्करोगाचे निदान करता येणार आहे आणि ते देखील 90% अचुकतेसह. आम्ही सगळ्या महिलांना नियमित पद्धतीनी ही चाचणी करण्याचा सल्ला देतो ज्यामुळे स्तनाचा कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकेल. या आधुनिकतेसह, आपण एकत्रितपणे स्तनाच्या कर्करोगाशी लढू शकतो आणि त्याला हरवू देखील शकतो.”

जागतिक स्तरावर स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळून येणारा कर्करोग आहे. आता या प्रकाराने फ़ुफ़्फ़ुसाच्या कर्करोगाला देखील मागे टाकले आहे. 2020 सालामध्ये सुमारे 2.3 दशलक्ष नव्या केसेस आढळून आल्या ज्या एकूण कर्करोगाच्या केसेस पैकी 11.7% एवढ्या होत्या. एपिडेमियोलॉजिकल अभ्यासातून असे लक्षात आले आहे की 2030 सालापर्यंत स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस या सुमारे 2 दशलक्षापेक्षा जास्त असतील . भारतात, 1965 आणि 1985 दरम्यान कर्करोगाच्या केसेस बऱ्याच वाढताना दिसून आल्या आहेत, सुमारे 50%. भारतात 2016 मध्ये केसेसची संख्या ही 118000 होती. माहितीनुसार, भारतात, 2020 साली स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस ची संख्या ही सुमारे 13.5% (178361) होती तर  मृत्युंची संख्या ही 10.6% (90408) एवढी होती.

कर्करोगा बद्दलच्या  जागृकतेचा विचार आणि लवकर निदान होण्याच्या स्क्रीनिंग करिता ईझीचेक-ब्रेस्ट सारखी चाचणी ही आवश्यक आहे, यामुळे लवकर निदानाचे योग्य ज्ञान आणि कर्करोगाच्या काळजी करिताचा एकूण उपचार किती महत्वाचे आहे हे देखील समजून येईल. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight