टकाटक' चित्रपटाचे त्रिवर्षपूर्ती ग्रॅड सेलिब्रेशन

'टकाटक' चं त्रिवर्षपूर्ती ग्रॅड सेलिब्रेशन

२८ जून २०१९ ही तारीख मराठी सिनेरसिकांना नक्कीच आठवत असेल. २०१९ वर्षातील सहा महिने संपायला आले असतानाही जून महिना येऊनही मराठी सिनेसृष्टीच्या बॅाक्स आँफिसवर जणू दुष्काळच पडला होता. एकही चित्रपट तिकिटबारीवर कमाल दाखवू शकला नव्हता. अशा परिस्थितीत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा ॲडल्ट काॅमेडी असलेला 'टकाटक' प्रदर्शित झाला. ट्रेलर बोल्ड असल्यानं सुरुवातीला काहींनी नाकं मुरडली, पण २८ जून २०१९ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि जणू चमत्कारच झाला. ॲडल्ट काॅमेडी असूनही विनोदाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मेसेज देणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली आणि बघता बघता या चित्रपटानं बाॅक्स आँफिसवरही 'टकाटक' बिझनेस केला. या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याचं जंगी सेलिब्रेशन नुकतंच 'टकाटक'च्या टिमनं केलं.

'टकाटक'ला तीन वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निर्मात्यांकडून जंगी सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी 'टकाटक'मधील बाबूराव ठोके म्हणजेच प्रथमेश परबसह सर्व टिम उपस्थित होती. कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत केक कापून 'टकाटक'ला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. आपण केलेल्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केल्याचं समाधान यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पहायला मिळत होतं.

'टकाटक' हा चित्रपट विनोदाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मेसेज पोहोचवणारा होता. त्यामुळं तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. महाराष्ट्रातील शहरांपासून गावांपर्यंत सर्वच ठिकाणी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आणि त्या माध्यमातून लेखक-दिग्दर्शकांचं म्हणणं प्रत्येकापर्यंत पोहोचल्याचं समाधान लाभलं. प्रेक्षकांपासून जाणकारांपर्यंत सर्वांच या चित्रपटाचं कौतुक केलं. यातील संवादांपासून गीत-संगीतापर्यंत आणि अभिनयापासून सादरीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा ठरला होता. 

दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाले की, 'टकाटक'ला मिळालेलं यश हे रसिकांसोबतच या टिममध्ये सहभागी असलेल्या लहानातील लहान घटकाचं श्रेय आहे. कलाकार पडद्यावर परफॅार्म करतात, आम्ही पडद्यामागं राहून काम करतो, पण जे कधीही प्रकाशझोतात येत नाही त्या सर्वांचंही मोलाचं योगदान 'टकाटक' घडवण्यात आहे. 

'टकाटक'ला मिळालेल्या तुफानी यशामुळे खूप आनंदी असलेले निर्माते ओमप्रकाश म्हणाले की, माझा स्वतःवर विश्वास होता, हा चित्रपट कमाल करू शकतो याची मला खात्री होती. त्यानुसार कथा लोकांना भावली. मिलिंद कवडे एक चांगला सिनेमा बनवतील असा विश्वास होता. 'टकाटक'चं संपूर्ण प्रोसेस मी जवळून अनुभवली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर बनल्याने निर्माता म्हणून 'टकाटक'चा प्रवास अविस्मरणीय राहील.

आता १८ ऑगस्ट २०२२ रोजी 'टकाटक २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'टकाटक २'ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight