अखेर अनामिका देणार प्रेमाची कबुली?
तू तेव्हा तशी या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना भलतीच आवडली. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि अनामिकाचा अबोला पाहुन सौरभ शहर सोडण्याचा निर्णय घेतो पण हे अनामिकाला माहित नाही आहे. प्रेक्षकांना मालिकेत आता पुढे पाहायला मिळेल की बाहेरगावी गेलेली वल्ली मुद्दम सौरभच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येते आणि अनामिकाला घेऊन येते या बोलीवर ती अनामिकाकडे जाते. पण इकडे सौरभचा निर्णय पक्का आहे. तो बँगलोरला निघाला आहे. वल्ली अनामिकाला सगळं सांगते आणि अनामिका सौरभला थांबवायला निघते. पण वल्लीने अनामिकाला मुद्दाम चुकीचा पत्ता देते. अनामिका तिथे पोहोचु नये यासाठी वल्ली अनेक प्रयत्न करते पण अखेर अनामिका तिथे पोहोचते. आता अनामिका सौरभला गाठू शकेल का? तिच्या प्रेमाची कबुली देईल का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार
आषाढी एकादशीला वारक-यांसाठी आगळंवेगळं ‘ विठ्ठल दर्शन ’..! विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला,जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही. धांवोनियां आलो पहावया मुख । गेले माझे दुःख जन्मांतरिंचे ॥ ऐकिले ही होते तैसे चि पाहिले । मन स्थिरावले तुझ्या पायी॥ तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही. विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार करत आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' अभिनेते...
Comments
Post a Comment