प्रतीक अग्रवाल ईटी एनर्जी अवॉर्ड्स २०२२

स्टरलाइट पॉवर चे व्यवस्थापकीय संचालक, प्रतीक अग्रवाल ईटी एनर्जी अवॉर्ड्स २०२२ मध्ये ‘सीईओ ऑफ द इयर’ म्हणून सन्मानित

स्टरलाइट पॉवर चे व्यवस्थापकीय संचालक प्रतिक अग्रवाल यांना ऊर्जा उद्योगातील त्यांच्या प्रतिष्ठित नेतृत्वासाठी इकॉनॉमिक टाइम्स एनर्जी लीडरशिप अवॉर्ड्स 2022 मध्ये 'सीईओ ऑफ दि इयर' (नॉन-रिन्यूवेबल्स) म्हणून ओळख मिळविली आहे. अल्पावधीतच, प्रतीक अग्रवाल यांनी पॉवर ट्रान्समिशन स्पेस मध्ये वैश्विक नेत्याच्या रूपामध्ये स्टरलाइट पॉवरला स्थापित केले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली, स्टरलाइट पॉवर ही ब्राझीलमध्ये ट्रान्समिशन प्रकल्प जिंकणारी पहिली भारतीय कंपनी बनली, 2017 मध्ये बाजारात प्रवेश केला आणि  अगदी कमी वेळेमध्ये $2 अब्ज पोर्टफोलिओ तयार केला. भारतातील पहिल्या पॉवर सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) च्या स्थापने मागे आणि लॉन्च करण्यामागे देखील प्रतीक हे प्रेरक शक्ती होते.

स्टरलाइट पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक अग्रवाल म्हणाले, "या प्रतिष्ठित श्रेणीत नामांकन केल्याबद्दल आणि पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी ईटी एनर्जी टीम, ज्युरी सदस्यांचे आभार मानू इच्छितो. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी नम्र आणिआनंदी आहे. आम्ही स्टरलाइटवर, जागतिक डीकार्बोनायझेशन प्रयत्न आणि हवामान बदल मर्यादित करण्यासाठी अर्थपूर्ण रीतीने योगदान देण्यास कटिबद्ध आहोत. हा पुरस्कार आम्हाला स्टरलाइट पॉवरला ऊर्जा वितरणातील कठीण आव्हाने सोडवून मानवतेला सशक्त बनवण्याचा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी प्रेरणा देत राहील.”

व्हार्टन आणि लंडन बिजनेस स्कूल चे माजी विद्यार्थी, प्रतीक वीज पारेषणची असीमित क्षमता आणि समाजाच्या विकासावर उच्च गुणवत्ता असलेल्या विजेच्या स्थायी प्रभावाने प्रेरित आहेत.

इकोनॉमिक टाइम्स एनर्जी लीडरशिप अवार्ड्स ऊर्जा क्षेत्रामधील असाधारण योगदानाचा सम्मान करते, संगठना, नेता, नवोन्मेषक आणि ट्रेंडसेटर्सना मान्यता देते  - अशा संस्था ज्या आपल्या संबंधित डोमेनमध्ये संपूर्ण बदलाव आणि निरंतर विकासासाठी नेतृत्व आणि परिचालन उत्कृष्टतेचे प्रतीक आहेत.

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight