गोदरेज फूड ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२

'गोदरेज फूड ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२'ने व्‍यक्‍त केले की, भावी खाद्यपदार्थ सर्वांगीण आरोग्‍य देणारे असले पाहिजेत

मुंबई, २४ जून २०२२: ग्राहकांना आरोग्‍याचे महत्त्व समजले आहे अणि त्‍यापेक्षाही अधिक म्‍हणजे शारीरिक व मानसिक आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यासोबत आहार देखील उत्तम असणे गरजेचे आहे हे समजले आहे. हायपर-कनेक्‍टीव्‍हीटी आणि हायब्रिड विश्‍वाच्‍या युगात व्‍यक्‍ती कार्यरत राहण्‍यासाठी पोषणावर लक्ष केंद्रित करत आहेत. यामधून रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे घटक, पारंपारिक खाद्यपदार्थांमध्‍ये रूची अशा बाबी दिसून येतात. गोदरेज फूड्स ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२ – कलेक्‍टर्स एडिशनचा संपूर्ण भारतातील २०० हून अधिक शेफ आणि पाककला तज्ञांच्या योगदानावर आधारित या ट्रेण्‍ड्सचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जे आगामी वर्षात खाद्य उद्योगावर वर्चस्व गाजवतील. या तज्ञांनी उद्योग आणि होम किचन्‍ससंदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार २०२२ हे आरोग्‍यास अनुकूल अशा खाद्यपदार्थाचे वर्ष राहिल आणि हीच मानसिकता आगामी वर्षांमध्‍ये पाहायला मिळेल. 

अनेक तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की२०२२ मध्‍ये आरोग्‍यास अनुकूल अशा खाद्यपदार्थांवर लक्ष केंद्रित केले जाणार असताना पारंपारिक घटकस्वयंपाक पद्धती आणि वैयक्तिकरित्या अनुकूल आहार यांचा सखोल शोध घेतला जाईल.

आरोग्‍यास अनुकूल खाद्यपदार्थांशी संबंधित काही इतर प्रमुख निष्‍पत्ती:

·         वैयक्तिकरित्‍या सानुकूल आहार - ५५.४ टक्‍के पॅनेलने अंदाज वर्तवला की, वैयक्तिकरित्‍या सानुकूल आहारांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.

·         आहारांमध्‍ये प्रथिने – ४४.६ टक्‍के पॅनेलचे मत आहे की, लोक आहार नियोजनामध्‍ये प्रथिनांवर अधिक लक्ष केंद्रित करतील.

·         स्‍थानिक घटकांना प्राधान्‍य – २९.२ टक्‍के पॅनलिस्‍ट्सना आढळून आले आहे की लोकांनी स्‍थानिक, हंगामी व मूळ घटकांना अधिक प्राधान्‍य देण्‍यास सुरूवात केली आहे आणि ५५.४ टक्‍के पॅनलिस्‍टचा स्‍थानिक व हंगामी घटकांच्‍या सोर्सिंगवर वाढ होण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे.

·         सेंद्रिय घटक – ७०.८ टक्‍के पॅनलिस्‍ट्स म्‍हणाले कीलोक आता स्‍थानिक शेतकरी व अन्‍न उत्‍पादकांकडून खरेदी करत आहेत.

·         जीवनशैली-आधारित मेनू – ४६.२ टक्‍के पॅनल सदस्‍य म्‍हणतात कीलोक विशिष्‍ट जीवनशैली-आधारित आहार मेनूंचे पालन करत आहेत.

·         रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे मेनू – ४४.६ टक्‍के पॅनलचा मेनूंमध्‍ये आरोग्‍य व रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणा-या घटकांवर अधिक लक्ष केंद्रित असण्‍याचा अंदाज आहे, तर ३८.१ टक्‍के पॅनलिस्‍टच्‍या मते रोगप्रतिकारशक्‍ती व कार्यक्षम आरोग्‍य वाढवणा-या आरोग्‍यदायी पेयांसाठी मागणी वाढेल.

·         वनस्‍पती आधारित मेनू (मेनूमध्‍ये पालेभाज्‍या) – ४० टक्‍के पॅनिस्‍टचा वनस्‍पती आधारित मेनूसाठी (मेनूमध्‍ये पालेभाज्‍या) मागणीमध्‍ये वाढ होण्‍याचा अंदाज आहे.

आरोग्‍यास अनुकूल खाद्यपदार्थांबाबत आपले मत व्‍यक्‍त करत सेलिब्रिटी शेफ आणि एफॲण्‍डबी कन्‍सल्‍टण्‍ट शेफ अजय चोप्रा म्‍हणाले, ''शेफ्सनी त्‍यांच्‍या मेनूंमध्‍ये आपण घरी अवलंबणा-या पद्धती जसे हंगामी, पौ‍ष्टिक व पारंपारिक घटक व तंत्रांचा वापर यांसारख्‍या विचारशील बाबींचा समावेश करण्‍यास सुरूवात केली आहे, पण त्‍यामध्‍ये नाविन्‍यतेचा भर देखील करत आहे. आम्‍हाला समजले आहे कीआरोग्‍यदायी आहाराचे सेवन हे फक्‍त फॅड नसून गरज आहे. याच चांगल्‍या सवयीमुळे आपण आपल्‍या शरीराची शक्‍ती वाढवू शकतो. म्‍हणून मेनू अधिककरून वास्‍तविक असणार आहेत, आपण वापरणारे घटक, आपल्‍याला आवडणा-या डिशेस् याबाबत विचार करावा लागणार आहे, ज्‍यामुळे ते आरोग्‍यदायी असतील. आपल्‍याला पारंपारिक घटकांचा वापर नवीन व सर्जनशील पद्धतीने पाहायला मिळेल. उदाहरणार्थ, विविध स्‍वरूपांमध्‍ये बाजरी, टेण्‍डर कोकोनट सारखे ताजे घटक व ट्रेण्‍डी स्‍वरूपात फळे, स्‍मूदी बाऊल्‍स सारखे रोचक अवतार किंवा सरसों का साग सारखे विंटर स्‍पेशल डिशेस्, मस्‍टर्ड ग्रीन्‍स व बार्ली सलाड.''

याप्रसंगी बोलताना लिव्‍हऑल्‍टलाइफच्‍या सह-संस्‍थापक व चीफ कलिनरी ऑफिसर मोनिका मनचंदा म्‍हणाल्‍या, ''लोकांना जाणीव होत आहे की, आरोग्‍यदायी खाण्‍याच्‍या सवयी म्‍हणजे त्‍यांनी मनसोक्‍तपणे खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेणे नाही. ते त्‍यांच्‍या आरोग्‍यविषयक ध्‍येयांची पूर्तता करू शकणा-या स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थांची मागणी करत आहेत. लिव्‍हऑल्‍टलाइफमध्‍ये आम्‍ही सातत्‍याने डायबेटिक स्‍नॅक्‍स व डेसर्ट मागण्‍यांमध्‍ये ते पाहिले आहे.''

फूड ॲण्‍ड ट्रॅव्‍हल राइटर आणि रेस्‍टॉरंट क्रिटिक रोशनी बजाज संघवी म्‍हणाल्‍या, ''मुंबई व गोवा, पुणे व वडोदरामध्‍ये पोषणाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्‍यात आल्‍यामुळे स्‍वास्‍थ्‍य उद्योगाला उसळी मिळाली आहे. रेस्‍टॉरंट्स हळूहळू पुन्‍हा सुरू होत असताना आम्‍हाला रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे व आरोग्‍यास अनुकूल खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्‍या मेनूंची गरज दिसून आली. सलाड्स व स्‍मूदीज लोकप्रिय बनले, आपल्‍यापैकी अनेकजांनी पूर्वीपेक्षा शाकाहाराला अधिक प्राधान्‍य देण्‍यास सुरूवात केली. हायड्रोपोनिक शेते बहरली. आपण २०२२ मध्‍ये अधिक पुढे जात असताना किचनमध्‍ये नवीन स्‍वरूपासह पारंपारिक उपाय पाहायला मिळण्‍यासोबत पद्धतींचा शोध घेतला जात आहे, ज्‍याद्वारे आपण किचन्‍समधील खाद्यपदार्थंसह आपले शरीर आरोग्‍यदायी ठेवू शकतो.''

गोदरेज फूड्स ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२ च्‍या क्‍यूरेटिंग एडिटर रूशिना मुंशा घिल्डीयाल म्‍हणाल्‍या, ''वर्ष २०२० मध्‍ये आरामदायी खाद्यपदार्थांचे वर्चस्‍व होते. २०२१ मध्‍ये भारतीय प्रादेशिक पाककला तिच्‍या पौष्टिकतेमुळे प्रकाशझोतात आली. २०२२ दरम्‍यान आहार आरोग्‍यासंदर्भात लक्षणीय भूमिका बजावेल. आपली पाककला मुळे पुन्हा शोधूनतेल व तुपाचा आस्वाद घेऊनस्थानिक शेतकरी व अन्‍न उत्पादकांना पाठिंबा देऊन आणि भारतात आरोग्‍यासाठी आहार सेवनाचा असलेल्या आपल्‍या संपन्‍न पाककला वारसाचा शोध घेऊन आपण आपल्‍या पाककला परंपरांमध्ये बदल करत राहू. पारंपारिक अन्‍नप्रणालीपाककला पद्धतींमधील मूळ खासियततसेच आपले पारंपारिक अन्‍न आणि आपले आरोग्य यांच्यातील संबंधांवर लक्ष केंद्रित केले जाईल.''

गोदरेज फूड ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२ – सविस्‍तर ९५ पानी एडिशन डाऊनलोडसाठी www.vikhrolicucina.com येथे उपलब्‍ध आहे.      

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight