महामिनिस्टरच्या महाविजेत्या...

रत्नगिरीच्या लक्ष्मी ढेकणे वहिनी ठरल्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी

होम मिनिस्टरच्या महामिनिस्टर या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार हे ऐकून अनेकांनी तोंडात बोटं घातली. हि ११ लाखांची पैठणी पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. अखेर या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या १० जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी सामना रंगला आणि फायनलिस्ट वहिनींना टक्कर देत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे वहिनी ठरल्या महामिनिस्टरच्या महाविजेत्या.
११ लाखांची पैठणी आदेश भाउजीनी वहिनींना बक्षीस म्हणून दिली. या पैठणीला सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडलेले आहेत. हि पैठणी जिंकल्यावर वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
विजेत्या वहिनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, "महामिनिस्टर मध्ये ११ लाखांच्या पैठणीची मी मानकरी ठरली याचा मला प्रचंड आनंद होतोय. या प्रवासात मला खूप मैत्रिणी भेटल्या, बरेच चांगले अनुभव आले, खूप धमाल मजा मस्ती आम्ही केली. हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे."
महामिनिस्टर नंतर आता २७ जून पासून होम मिनिस्टरच 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात. 
तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टर खेळ सख्यांचा चारचौघींचा सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO