टीव्हीला वाळवी लागणार  !

महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात वाळवी लागणार!

झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर एक पोस्ट वायरल होतेय ते म्हणजे  ''नवा गडी नवं राज्य' चा  राघव अचानक काहीतरी वेगळच असंबंध बोलतोय आणि वागतोय. त्याच्या घरातील टीव्ही ची तो जिवा पलीकडे काळजी घेतो आहे, तो घरातील कोणालाच टीव्ही ला हात सुद्धा लावू देत नाही आहे. राघव आपली बहीण वर्षा हिला सुद्धा टीव्ही लावू नको असा बजावतो आणि ह्या त्याच्या वागण्याचे वर्षा कारण विचारते, तर तो असे काहीतरी सांगतो कि वर्षा सुद्धा गहन विचारात पडते. परत वर्षा राघवला टीव्ही न लावायचं कारण विचारते तेव्हा राघव मोठ्या काळजी ने सांगतो कि टीव्हीला जपायला हवे कारण टीव्ही ला वाळवी लागणार आहे. हे एकूण वर्षा चक्रावूनच जाते. प्रेक्षकहो हे एकूण तुम्ही सुद्धा चक्रावलात ना !! हे तर खरं की टीव्ही ला वाळवी लागणार.

झी स्टुडिओज निर्मित 'वाळवी' चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला, आणि आता लवकरच म्हणजे येत्या १८ जूनला, संध्या. ७ वाजता त्याचा ‘वर्ल्ड टीव्ही प्रीमियर’ झी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित ह्या चित्रपटात ‘स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव’ हे प्रमुख भूमिकेत आहेत.  लाकडाला वाळवी लागली तर ती लाकूड पोखरून काढते ह्याचा प्रकारे जर नात्यानं वाळवी लागली तर काय होते हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. शेवट पर्यंत  खुर्चीला खिळवून ठेवणारा आणि अनेक गुपितं दडवून असलेला हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल.

यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता घरात लागलेली 'वाळवी' ही प्रेक्षकांचं  मनोरंजन करणार हे नक्की.

तेव्हा प्रत्येक घरात १८ जूनला संध्याकाळी ७ वा. टीव्हीला वाळवी लागणार आहे.

 Link: https://www.instagram.com/reel/CsTatPQMOXw/?igshid=NjFhOGMzYTE3ZQ==

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable