'रणरागिणी ताराराणी' नाटकाचा दिमाखदार शुभारंभ

'रणरागिणी ताराराणी' नाटकाचा दिमाखदार शुभारंभ 

फुलांची आकर्षक सजावटसनई-चौघडयांचे मंगलमय सूरशेकडोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकआणि सोबत जिजाऊंच्या ओव्या अशा पवित्र वातावरणात 'रणरागिणी ताराराणी' या नाटकाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून आमदार मा.महेश सावंत, निर्माता- दिग्दर्शक अशोक हांडेमाथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटीलकॅप्टन शिवाजी महाडकरलेखक सुखद राणे आणि कार्यकारणी मंडळाचे  सदस्य तसेच सामाजिक, राजकीय आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी रणरागिणी ताराराणी नाट्यनिर्मितीचे उचलेले शिवधनुष्य खरंच कौतुकास्पद आहे. हे नाटक बघण्याचा मला भाग्य लाभलं याचा मला आनंद आहे. छावा चित्रपट जसा हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे तसं रणरागिणी ताराराणी हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी करेलअसा विश्वास व्यक्त करताना आमदार मा.महेश सावंत यांनी या खास प्रयोगाला आमंत्रित केल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आभार मानले. संपूर्ण नाट्यगृह रणरागिणी ताराराणी नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला भरलेले पाहायला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून हा इतिहास सर्वदूर पोहचावा यासाठी आम्ही घेतलेल्या प्रयत्नांना नाट्यरसिकांची अशीच साथ लाभेल असा आशावाद श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) चे  अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. 

याप्रसंगी प्रमुख पाहणे असलेल्या आमदार मा.महेश सावंत आणि त्यांच्या पत्नीचा स्मृतिचिन्ह आणि ताराराणी  पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. अशॊक हांडेनरेंद्र पाटील या मान्यवरांना ताराराणी पुस्तकरूपी भेट  देण्यात आली. सुखद राणे यांच्या ये देशीचे दुर्ग या पुस्तकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. 

रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजीस्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. रणरागिणी ताराराणी नाटकाची संकल्पना चंद्रकांत सावंत यांची असून निर्माते ब्रिगेडियर सुधीर सावंत आहेत. लेखन युवराज पाटील तर दिग्दर्शन विजय राणे यांचे आहेया शुभारंभाच्या प्रयोगानंतर पुढील प्रयोग शुक्रवार २१ फेब्रुवारी रात्रौ. ८. ३० वा.( क्रां वासुदेव फडके पनवेल)शनिवार २२ फेब्रुवारी  दुपारी ४.३० वा (आचार्य अत्रे कल्याण), रविवार २३ फेब्रुवारी रात्रौ. ८. ३० वा ( कालिदास नाट्यमंदिर मुलुंड )सोमवार २४ फेब्रुवारी  सायं ७. ३०( श्री छत्रपती शिवाजी  मंदिर दादर ) येथे रंगणार आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025