अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांचं नवं “स्नेह” गाणं प्रदर्शित

स्नेह : व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी संगीत विश्वातील पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंट

अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांचं नवं “स्नेह” गाणं प्रदर्शित

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन इंस्ट्रुमेंटल ‘स्नेह’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाण निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणार आहे. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. आदित्य बर्वे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे.

अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, भावनात्मक गहनता दर्शवत एक सुंदर दृश्य अनुभव देणार आहे. हे गाणं लग्न झालेल्या नवीन जोडप्याची कहाणी सांगतं.

फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या स्नेह या गाण्याची निर्माती अभिनेत्री नम्रता गायकवाड ही आहे. तर अमेश देशमुख यांनी सुरेल बासरी या गाण्यात सादर केली आहे.

नम्रता गायकवाड यांनी बाई ग, स्वराज्य, मराठी पाऊल पडते पुढे अश्या मराठी चित्रपटांमध्ये तर रानबाजार या वेबसीरीजमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. तर माधव देवचके यांनी हिंदी सिरीयल्स, मराठी चित्रपट, तसेच बीग बॉस मराठी या रियालिटी शोमध्ये दमदार कामगीरी केली आहे.

अभिनेत्री नम्रता गायकवाड स्नेह गाण्याविषयी सांगते, “स्नेह हे मराठीतील पहिलच गाण आहे जे इंस्ट्रुमेंटल गाण आहे. शब्दाविणा तयार झालेल्या पहिल्याच गाण्याची निर्मिती मला करायला मिळाली हे माझ भाग्यच समजते. जिथे शब्द मौन होतात तिथे भावना बोलू लागतात आणि भावना थेट काळजाला भिडतात असा काहीसा अनुभव होता. प्रेक्षकांना गाण्याचा टीज़र आणि गाण खूप आवडतय त्यामुळे खूप आनंद वाटतोय.”

संगीत दिग्दर्शक आदित्य बर्वे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “मला गिटार प्ले करत असताना एक ट्यून सुचली होती. मग मी तीच ट्यून वापरून बासरी आर्टिस्ट सोबत बसून मी ती ट्यून डेव्हलप केली आणि मग ठरवलं की यावर एखाद इंट्रुमेंटल गाण करायचं. नम्रताला ही संकल्पना आवडली आणि मग या गाण्याचं चित्रीकरण आम्ही अलिबाग येथे केल. शब्दाविणा गाण करायचा वेगळा प्रयोग आहे आणि तो प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो.”

मधुर संगीत, हृदयस्पर्शी कथा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून स्नेह हे गाणं या वैलेंटाईन वीकमध्ये एक परिपूर्ण रोमँटिक भेट ठरणार आहे. प्रेमाच्या दुनियेत हरवण्यासाठी तयार व्हा!

Link : https://youtu.be/FsEm8nsM7Qo?si=Rf3HhGCWwEE-srV3

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..