‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी

चिकी चिकी बुबूम बुम मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी

पार्टी  म्हटलं  की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियन  च्या असाच एका सेलिब्रेशनसाठी  मराठीतील  नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत. आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार आहेत. चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटातील प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे पार्टी टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रशांत मडपुवार यांनी  लिहिलेल्या या हॅपनिंग साँगला रोहन-रोहन जोडीचे जबरदस्त संगीत लाभले आहे. तर रोहन प्रधान  यांच्या आवाजाने हे गाणे अधिकच जल्लोषमय झाले आहे. राहुल ठोंबरे यांनी या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडणारं आहे.

स्वप्नील जोशीप्रार्थना बेहरेप्राजक्ता माळीप्रसाद महादेव खांडेकररोहित मानेप्रथमेश शिवलकरनम्रता संभेराववनिता खरातसचिन गोस्वामीओंकार राऊतप्रियदर्शनी इंदलकरअभिजीत चव्हाणनिखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे,  चेतना भटनिखिल बनेश्याम राजपूतऐश्वर्या बडदेश्लोक खांडेकरप्रमोद बनसोडे या कलाकारांची  फौज चिकी चिकी बुबूम बुम  चित्रपटात  हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत. त्यांच्या पार्टीतली गंमत आणि धमाल हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात येणारा 'चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मितआयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या चिकी चिकी बुबूम बुम चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकरप्रसाद महादेव खांडेकरयांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..