१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन..
१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन
भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी
नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे , कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आदि मंडळी उपस्थित होती.
२० फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत मुंबईत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी या महोत्सवातील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवा मागचा उद्देश सांगताना नाटयपरिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे म्हणाले की, या महोत्सवामुळे मुंबईतील कलाकारांना आणि नाट्यरसिकांना वेगवेगळ्या राज्यातील, प्रांतातील नाटकं, त्यांचं सादरीकरण, तिथल्या कलाकारांविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहे. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे.
या नाट्य महोत्सवाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, मुंबई
नाट्य महोत्सव
स्थळ : यशवंत नाट्य मंदिर – मुख्य रंगमंच | ||
दिनांक | कार्यक्रमाचे नाव | वेळ |
२० फेब्रुवारी २०२५ | अनीक थिएटर, कोलकता नाटक : अक्षरिक (बंगला)
| सायंकाळी ७.३० वाजता |
२१ फेब्रुवारी २०२५ | थिएटर अर्पणा, मुंबई नाटक : बॅरीकेड (हिंदी)
| सायंकाळी ७.३० वाजता |
२२ फेब्रुवारी २०२५ | राखाडी स्टुडिओ, पुणे नाटक : ठकीशी संवाद (मराठी)
| दुपारी ४.३० वाजता |
२३ फेब्रुवारी २०२५ | वेलिपडई थिएटर मूवमेन्ट, पाँडिचेरी नाटक : नाडापावाडई (तामिळ)
| सायंकाळी ७.०० वाजता |
प्लेहाऊस प्रोडक्शन, मुंबई नाटक : गरम रोटी (इंग्रजी, तामिळ, हिंदी)
| रात्रौ ९.०० वाजता |
स्थळ : जयश्री आणि जयंत साळगावकर प्रायोगिक रंगमंच | ||
दिनांक | कार्यक्रमाचे नाव | वेळ |
२४ फेब्रुवारी २०२५ | टाईनी टेल्स थिएटर कंपनी, पुणे नाटक : तुजी औकात काये? (मराठी)
| सायंकाळी ७.०० वाजता |
परिसंवाद : प्रायोगिक नाटक सहभाग – आलोक राजवाडे,युगंधर देशपांडे, प्रतीक्षा खासनीस, योगेश्वर बेंद्रे संवादक – सचिन शिंदे | रात्रौ ८.३० वाजता | |
२५ फेब्रुवारी २०२५ | रेनबो अंब्रेला प्रोडक्शन, पुणे नाटक : मग तू मला खा! (मराठी)
| सायंकाळी ७.०० वाजता |
मेधा अग्रवाल, पुणे नाटक : एसिमप्टोमॅटीक (इंग्रजी, हिंदी)
| रात्रौ ८.३० वाजता | |
२६ फेब्रुवारी २०२५ | अच्युत वझे लिखित ‘चल रे भोपळ्या टुणूकटुणूक’ या नाटकाचे पुस्तक प्रकाशन | सायंकाळी ७.०० वाजता |
परिसंवाद : व्यावसायिक नाटक सहभाग – अद्वैत दादरकर, नीरज शिरवईकर, संदेश बेंद्रे, संवादक – मुग्धा गोडबोले | रात्रौ ७.३० वाजता | |
२७ फेब्रुवारी २०२५ | पार्थ थिएटर नाटक : मॅड सखाराम (मराठी)
| सायंकाळी ७.०० वाजता |
पार्थ थिएटर नाटक : मराठी वाड्मयाचा घोळीव इतिहास (मराठी)
| रात्रौ ९.०० वाजता
| |
२८ फेब्रुवारी २०२५ | थिएटर फ्लेमिंगो, काणकोण, गोवा नाटक : मुकभट (कोंकणी)
| सायंकाळी ७.०० वाजता |
थिएटर फ्लेमिंगो, काणकोण, गोवा नाटक : स्टँडअप विनोद (मराठी)
| रात्रौ ९.०० वाजता |
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, मुंबई
नाट्य महोत्सव – दिनांक - १ आणि २ मार्च २०२५
स्थळ : आण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा | ||
संस्था | कार्यक्रम |
|
बालनाट्य - नाट्यरंग थिएटर, जळगाव
| म्हावरा घावलाय गो | सकाळी १०.०० वाजता |
नाट्य छटा
| शर्व दाते, पुणे | सकाळी ११.२०वाजता |
नाट्य छटा
| अर्पिता येवले, पुणे | सकाळी ११.३० वाजता |
नाट्य छटा
| निषाद दांडेकर | सकाळी ११.४० वाजता |
नाट्य वाचन - कलाकंड, पुणे
| कवटीतला कैदी | सकाळी ११.५० वाजता |
नाट्य वाचन – सिंदफणा पब्लिक स्कूल, माजल
| दगड पडलेला प्रश्न | सकाळी १२.१५ वाजता |
अ.भा.मराठी नाट्य परिषद, धाराशिव शाखा | पारंपारिक नृत्य
| सकाळी १२.४० वाजता |
प्रगती सेवाभावी संस्था, बीड
| एकांकिका – नवस | दुपारी १.०० वाजता |
एकपात्री
| किशोर पुराणिक, परभणी | दुपारी २.३० वाजता |
एकपात्री
| पुजा घोडके, नाशिक | दुपारी २.४० वाजता |
एकपात्री
| वेदिका वाबळे | दुपारी २.५० वाजता |
नाट्य संगीत पद गायन | सार्थक बावीकर
| दुपारी ३.०० वाजता |
Comments
Post a Comment