टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रात नाही तर सातासमुद्रापार देखील आपली जादू दाखवली आहे. इंग्लंड ,युएई जीसीसी या प्रदेशांनंतर आता 'फसक्लास दाभाडे' ने बार्सिलोना आणि स्पेनमध्ये आपली छाप पाडून रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. रसिकांनी तिकडेही चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असून महाराष्ट्राबाहेरही ‘फसक्लास दाभाडे' ने आपली जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलंय. चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्य प्रमुख भूमिका आहेत. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.
कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार
आषाढी एकादशीला वारक-यांसाठी आगळंवेगळं ‘ विठ्ठल दर्शन ’..! विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला,जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही. धांवोनियां आलो पहावया मुख । गेले माझे दुःख जन्मांतरिंचे ॥ ऐकिले ही होते तैसे चि पाहिले । मन स्थिरावले तुझ्या पायी॥ तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही. विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार करत आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' अभिनेते...
Comments
Post a Comment