अमेरिकेत अवतरणार ‘सुंदरी’

 अमेरिकेत अवतरणार सुंदरी

लावणी म्हणजे रसरंगांचं कारंजं!  शब्दलावण्यभावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार.  या आविष्काराला  वेगळं रूप देत आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न होणे हे कौतुकास्पदच. लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली.  कलेच्या माध्यमातून  रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने  'सुंदरी The history of Lavani (अदा ताल शृंगार) या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती  यशस्वी केली. 

 

मुंबईत 'सुंदरी The history of Lavani (अदा ताल शृंगार)  शो ला  मिळालेल्या अभूतपूर्व  प्रतिसादानंतर आता 'सुंदरी या शोचा नजराणा जुलै महिन्यात अमेरिकेत रंगणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर आणि आशिष पाटील या दोघांच्या अदाकारीने ही नृत्य मैफिल सजणार आहे. लय-तालाचा आविष्काररंगमंचीय सहजता, आत्मविश्वास  या सर्व  गोष्टींच्या जोरावर विलोभनीय नृत्याविष्काराचे दर्शन 'सुंदरी' या शोमधून घडविले आहे. तालसौंदर्य उलगडत रसिकांसमोर झालेले हे सादरीकरण आणि त्याचा आस्वाद आता अमेरिकेतील कलाप्रेमींना जुलै मध्ये घेता येणार आहे.   

 

लोकप्रिय संगीतातून आणि तितक्याच लयबद्ध नृत्याविष्कारातूनत्यातील भावभावनांचे लोभसवाणे सादरीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आशिष पाटील  हा प्रयत्न खरंच  स्तुत्य आहे. 'सुंदरी The history of Lavani (अदा ताल शृंगार) हा अविस्मरणीय कार्यक्रम मनाचा ठाव घेतो, अशा शब्दांत रसिकांनी आणि मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025