"ऑडिशनला एक मोनोलॉग दिला होता आणि..." - नीरज गोस्वामी

 "ऑडिशनला एक मोनोलॉग दिला होता आणि..." - नीरज गोस्वामी

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेनंतर नीरज गोस्वामी 'तुला जपणार आहे' या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नीरज या मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे. नीरजने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला."माझ्या भूमिकेचं नाव अथर्व आहे. अथर्वच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर त्याची सध्याची मनस्थिती अशी आहे की, त्याच्या आयुष्यात एक  खूप  मोठं  दुःख आहे. त्याची   बायको अंबिका एका  अपघातामध्ये जाते. त्याच्याशी  जोडलेला एक ओपन एंडेड  प्रश्न  आहे की  त्याला त्या  ऍक्सीडेन्ट  बद्दल  १००% माहिती  नाही की तो कसा झाला. त्याला  एक विचार सतत खात  आहे  की त्याची  मुलगी  त्याच्याशी  बोलत  नाही, त्याच्याकडे  बघतही नाही. अथर्व  त्या  गरजेला कसं  पूर्ण करणार  हा मालिकेमध्ये  त्याचा  प्रवास  असणार  आहे.  या मालिकेत बरेच VFX  आणि  इफेक्ट  वापरले  जाणार  आहेत  म्हणून  शूट  करायची  पद्धत  जरा  वेगळी  आहे. माझी या भूमिकेसाठी निवड कशी झाली याचा किस्सा ऐकवायची झाला तर तो असा आहे कि, झी मराठी टीमने  मला  'सारं  काही  तिच्यासाठी' नंतर  रिपीट  करणं  योग्य  समजलं  त्या  बद्दल  मी  त्यांचे   आभार  मानतो. माझं  सिलेक्शन  ऑडिशन देऊन झालं आहे. ऑडिशनला  एक  मोनोलॉग  दिला  होता आणि  माझे  इंटरप्रेटेशन  डायरेक्टरला  आवडली. मग ती  ऑडिशन पुढे  पाठवली  गेली. झी  मराठी   टीम  माझे  नुआन्सेस , डिटेल्स  नोटीस  करू  शकली  त्या  बद्दल  आय  फील  गुड . अशी  ऑडिशनची  प्रोसेस  होती  ज्यातून माझी  निवड  झाली. प्रोमो  बघून  आणि  जे  थोडंफार  सीन्स  मी  करू  शकलो  आहे,  त्यावर  मी खात्री देऊ शकतो की प्रेक्षक शर्वरी  लोहकरे , ऋचा  गायकवाड , प्रतीक्षा  शिवणकर , सिद्धीरूपा  करमरकर, संदेश  उपश्याम  सारख्या  कलाकारांच्या  प्रेमात  पडतील. हे सर्व  उत्तम  कलाकार  आणि  त्यांच्या  व्हर्साटिलिटीचा  आनंद  ऑडियन्सला  घेता  येणार  आहे. जेव्हा  प्रोमो बाहेर आला तेव्हा अनेक  प्रतिक्रिया मिळाल्या. एकूणच  प्रोमोचा  चांगला  रिस्पॉन्स  आहे. खूप  सिनेमा  सारखा  आणि  टॉप  नोच  पद्धतीने  शूट  केलं  गेले आहे. अशी  एक  सर्वांची कॉमन रिएक्शन  बघायला मिळत  आहे. फँटसी, फिक्शन- ड्रॅमा असा  जॉनर  असलेला  हा  शो  आहे. खूप  रिसर्च  आणि  मेहनत  घेणारी चॅनेलची  टीम  आहे तर  प्रॉडक्ट  हाय  क्वालिटी  असणार  आहे  आणि  मला  विश्वास  आहे  की ऑडियन्सला  हा  शो  नक्की  आवडणार  आहे. रात्री  १०:३०  चा  स्लॉट असल्यामुळे सगळी  घरची आणि ऑफिसची  काम  झालेली  असतील, तर प्रेक्षकांना फक्त  टीव्ही  ऑन  करून  बसायचं  आहे  आणि  मनोरंजनाचा आनंद  घ्यायचा आहे. अभिनया व्यतिरिक्त मला  वाचायला  आवडत  मग ते सिनेमांचे स्क्रिप्ट्स, ,स्पॅनिश  बुक्स असो.  माझा  जॅमिंग  पार्टनर  असेल  तर  गिटार  वाजवायलाही  खूप  आवडत. अधून  मधून  वेळ  असेल  तर  रात्री  स्विमिंग करणं  मला  थेरपी  सारखं आहे.  मी या  मालिकेमागची  मेहनत  आणि  तयारी  बघत आहे. ही मालिका बाकी मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे यात शंकाच नाही. प्रेक्षकाना वेगळ्या प्रकारचं मनोरंजन  देणारी ही मालिका  असणार  आहे.”

प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट! 'तुला जपणार आहे’ १७ फेब्रुवारीपासून दररोज रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..