अमेरिकन ईगल

अमेरिकन ईगलने फ्रेन्चायझी स्टोअर्ससह केले रिटेल विस्तारीकरणभारतात 3 वर्षांत 50 स्टोअर्स सुरू करण्याची योजना

-    राजस्थानमधील जयपूर येथे 1700 चौ. फुटात पसरलेले पहिले हाय स्ट्रीट पार्टनर्ड स्टोअर केले सुरू 

मुबई, 23 मे 2022 : 1977 पासूनचा अमेरिकेतील लोकप्रिय जीन्स ब्रँड असलेल्या अमेरिकन ईगलने राजस्थानमधील जयपूर येथे त्यांचे पहिले फ्रेन्चायझी स्टोअर सुरू केले. अमरिकन ईगल आउटफिटर्सइन्क. (एनवायएसई : एईओ) यांच्यातर्फे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडला दिलेल्या परवान्याअंतर्गत हे स्टोअर सुरू करण्यात आले.

या लाँचसह ब्रँडची भारतभर आपले अस्तित्व निर्माण करण्याची योजना आहे. या माध्यमातून त्यांना आपल्या ग्राहकांचा अनुभव अधिक सुविधाजनक करायचा आहे.

जयपूरमधील स्टोअर 1700 चौ. फुटात पसरलेले आहे आणि हे स्टोअर दोन मजली आहे. या ब्रँडसाठी हे भारतातील पहिले हाय स्ट्रीट स्टोअर आहे.

या आयकॉनिक ब्रँड स्वतंत्र व्यक्तिमत्वस्वातंत्र्य आणि स्व-अभिव्यक्तीचा पुरस्कार करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा फिट मिळविण्यास मदत करण्याची अमेरिकन ईगलची भूमिका आहे. ते जीन्स प्रकारातील ताजे ट्रेंड्स उपलब्ध करून देतात. यात महिलांसाठी 24-36 इंच या रेंजमधील तर पुरुषांसाठी 29-38 इंच रेंजमधील साइझ मिळू शकतात.

या हंगामात खाली लोकप्रिय जीन्स उपलब्ध आहे :

·         पुरुषांसाठी : नवीन एअरफ्लेक्स+स्कीनी आणि 360 स्लिमज्यात कायम फ्लेक्झिबिलिटी आणि आराम मिळतो. त्याचप्रमाणे प्लेड शर्टपोलो आणि ग्राफिक लोगो टी-शर्टमुळे त्यांना विविध प्रकारचे आउटफिटिंग पर्याय उपलब्ध होतात.

·         महिलांसाठी : फॅशन जीन्स आणि कम्फर्ट स्टाइलची रेंज आहे. यात मॉम स्ट्रेटपासून सुपर हाय-वेस्टेड फ्लेअरचा समावेश आहे. या जीन्स स्मॉक्ड वूव्हन टॉप्सआरामदायी ग्राफिक्स आणि बेबी टी-शर्ट्ससोबत खूपच शोभून दिसतात.

·         नव्या डेनिम कलेक्शनमध्ये 'रिअल गुडबॅजही आहे. या आयकॉनचा अर्थ हा कीअमेरिकन ईगल उत्पादने पृथ्वीला विचारात घेऊन तयार करण्यात आली आहेत आणि अधिक शाश्वत तंत्रे वापरून त्यांची निर्मिती केली आहे. पाण्याचे रिसायकलिंग व रिडक्शनसाठीची एईओची इन्क.च्यां प्रमानकांची पूर्तता करणाऱ्या कारखान्यात ही उत्पादने तयार केली आहेत.

 या लाँचवर प्रतिक्रिया देताना अमेरिकन ईगलइंडियाचे ब्रँड हेड श्री. आशीष मुकुल म्हणाले, "अमेरिकन ईगल हा आयकॉनिक ग्लोबल जीन्स ब्रँड आहे आणि जयपूरसारख्या भक्कम बाजारपेठेमध्ये खूप संधी आहेत. एनसीआरहैदराबादपुणेचंदीगडचेन्नईमुंबईबंगळुरूकोलकाता आणि आतात जयपूरमध्ये असलेल्या स्टोअरसह आम्ही देशातील बहुतेक शहरांमध्ये आहोत." ते पुढे म्हणाले, "आम्ही ग्राहकांशी घट्ट नाते निर्माण केले आहे आणि हे बिझनेस मॉडेल सिद्ध झालेले आहे. देशभरात हा ब्रँड पोहोचविण्यासाठी आता पुढील तीन वर्षांत आम्ही अजून 50 स्टोअर्स सुरू करण्याची आमची योजना आहे. "नवीन कलेक्शन जयपूर स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे www.aeo.in या वेबसाइटवरही हे कलेक्शन उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight