एफसी गोवा
एफसी गोवासोबतचा कायम राहण्याचा सेरिटॉन फर्नांडेसचा निर्णय
7 जून 2022: डिफेंडर सेरिटॉन फर्नांडेसने एफसी गोवासोबतचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करार कायम राहिल्याने भारताचा हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगच्या सलग सातव्या हंगामातही क्लबसोबत राहणार आहे.
एफसी गोवासोबतचा करार कायम राहिल्याने मला खूप आनंद झाला, असे फर्नांडेसने एफसीगोवाडॉटइनला सांगितले.
एफसी गोवाच्या माध्यमातून मी जवळपास पाच वर्षांपूर्वी इंडियन सुपर लीगमध्ये पदार्पण केले. त्यानंतर फुटबॉलपटू म्हणून खर्या अर्थाने उदयास आलो. मला आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू बनवण्यात एफसी गोवाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सांघिक कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सेरिटॉनने सांगितले.
एक अनुभवी खेळाडू म्हणून माझ्या जबाबदारीचे मला भान आहे, असे तो पुढे म्हणाला. एफसी गोवा एक सीनियर फुटबॉलपटू असल्याने माझी काय जबाबदारी आहे, हे मला चांगले ठाउक आहे. वैयक्तिक खेळ उंचावतानाच सर्व सहकार्यांना सोबत घेउन सांघिक कामगिरीत सातत्य राखण्याला मी कायम प्राधान्य दिले आहे. यापुढेही माझा तोच प्रयत्न राहील. आयएसएलमध्ये आजवर एफसी गोवाचा फरफॉर्मन्स चांगला राहिला आहे. मात्र, ट्रॉफीने हुलकावणी दिली आहे. पुढील हंगामात जेतेपद पटकावण्याचे आमचे लक्ष्य असेल, असा विश्वास फर्नांडेसने व्यक्त केला.
2017मधील आयएसएल प्लेयर्स ड्राफ्टच्या सातव्या फेरीमध्ये एफसी गोवा व्यवस्थापनाने सेरिटॉनवर विश्वास दाखवला. त्यानंतर 2017-18 हंगामात पहिल्यांदा खेळला. त्याचा करार तीन वर्षांचा होता.2022मध्ये त्याला कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2024 हंगामातही सेरिटॉन हा एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करेल.
सेरिटॉनचा करार कायम राहिल्याबद्दल एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील पाच हंगामात एफसी गोवाच्या योगदानात सेरिटॉनचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्याने प्रत्येक हंगामात स्वत:ला प्रगल्भ करताना सर्वोत्तम राइटबॅक म्हणून सिद्ध केले आहे. केवळ क्लब नव्हे तर राष्ट्रीय संघातील एक सर्वोत्कृष्ट डिफेंडर आहे. पुढील हंगामातही तो त्याचा फॉर्म आणि फिटनेस कायम राखेल, असा मला विश्वास असल्याचे पुस्कुर यांनी म्हटले.
फर्नांडेसने त्याच्या पोेझीशनला कायम न्याय दिल्याचे रवी यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष खेळादरम्यान सेरिटॉनने त्याची पोझीशन योग्य प्रकारे सांभाळली आणि न्याय दिला. मात्र,नवा कोचिंग स्टाफ असताना भविष्यात एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची क्लबला अधिक मदत होईल. तसेच पूर्ण क्षमतेसह तो बचावफळीचा वापर करेल, असेही आम्हाला वाटते. मागील हंगामात एफसी गोवाला प्ले ऑफ फेरी गाठता आली नाही. त्यामुळे क्लब व्यवस्थापन निराश आहे. मात्र, सर्व अनुभवी तसेच नवोदित खेळाडू खेळ उंचावताना नव्या हंगामात एफसी गोवाचा दरारा निर्माण करतील, असे वाटतेे. त्यासाठी सेरिटॉन फर्नांडेससारख्या फुटबॉलपटूंचा रोल महत्त्वाचा असेल, असे रवी पुस्कुर यांनी सांगितले.
कमालीचा स्टॅमिना एफसी गोवाचे (गौर्स) प्रतिनिधित्व करताना त्याच्या पहिल्या हंगामात 29 वर्षीय सेरिटॉनने 20पैकी 19 सामने खेळताना स्टॅमिना दाखवून दिला. 2018-19 आयएसएल मोसमात केवळ 21 मिनिटे तो मैदानाबाहेर राहिला. पहिल्यावहिल्या सुपर कप जेतेपदातही सेरिटॉन प्रत्येक सामन्यात खेळला. 2019-20 हंगामात एफसी गोवाने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावताना लीग विनर्स शील्ड आपल्या नावे केली. तसेच एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्रता सिद्ध केली. त्यातही फर्नांडेसचे योगदान लक्षणीय होते. आयएसएलमध्ये सेरिटॉनने 95 सामन्यांत 8257 मिनिटे मैदानावर घालवली आहेत. प्रत्येक सामन्यागणिक चेंडू टॅकल करण्याची त्याची सरासरी 3.64, क्लिअरन्स 2.44, ब्लॉक्स 1.11 तसेच पासेसची सरासरी 38.56 इतकी आहे. एकूणच ओव्हरऑल पासिंग अॅक्क्युरसी 78.81 टक्के इतकी आहे.
क्वेपेम स्थित सेरिटॉन हा एफसी गोवाच्या 2021 ड्युरँड कप विजेत्या संघाचा भाग होता.
Comments
Post a Comment