राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष केले पूर्ण..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष केले पूर्ण; राष्ट्रपती भवनात विविध प्रकल्पांची पायाभरणी/उद्‌घाटन तसेच राष्ट्रपतीपदाच्या एक वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या ई-पुस्तिकेचे केले अनावरण

नवी दिल्ली, 25 जुलै 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (25 जुलै 2023) आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केले.

तंत्रज्ञानाच्या मदतीने गेल्या वर्षभरातराष्ट्रपती भवन अधिकाधिक लोकांशी जोडले जात आहेयाबद्दल  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी समाधान व्यक्त केले. तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पकतेच्या मदतीनेराष्ट्रपती भवनाचे अधिकारी ही प्रणाली अधिकाधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी पुढेही  काम करतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती पदाच्या कारकीर्दीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित अनेक उपक्रमांमध्ये द्रौपदी मुर्मु सहभागी झाल्या होत्या. यात खालील उपक्रमांचा समावेश आहे-

  1. राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या शिव मंदिराच्या पुनर्विकासाची पायाभरणी त्यांनी केली.
  2. राष्ट्रपती भवन परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयांच्या क्रीडांगणातील क्रिकेट पव्हेलियन च्या कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले.
  3. ‘नवाचार’ चे उद्घाटन - राष्ट्रपती भवनाने इंटेल इंडिया कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या – नवाचार या कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त गॅलरीचे त्यांनी उद्घाटन केले. या गॅलरीमध्ये विद्यार्थी आणि एआय प्रशिक्षकांनी तयार केलेले इमर्सिव म्हणजेच त्रिमिती इनोव्हेशन्स आणि देशात विकसित एआय सोल्यूशन्स प्रदर्शित केले आहेत. यात सहा संवादात्मक  प्रदर्शने असून  त्यातून राष्ट्रपती भवनाच्या भव्यतेचा अनुभव प्रेक्षकांना येतो.  त्याशिवायएआय कौशल्याचा सर्वसामान्यांसाठी होणारा वापर प्रेक्षकांना प्रेरणा देणारा आहे.
  4. सूत्र-कला दर्पणचे उद्घाटन – राष्ट्रपती भवनातील वस्त्र संग्रहालयाचे उद्घाटन केले. या गॅलरीमध्ये प्राचीन वस्त्रांचा एक विशेष संग्रह प्रदर्शित करण्यात आला आहे.  राष्ट्रपती भवनाच्या अभिमानास्पद वारशाचे हे एक दस्तऐवजीकरण आहे. यात जरदोजी आणि सोन्याच्या नक्षीदार मखमलीपासून तयार कार्पेट्सबेड आणि टेबल कव्हरिंग्जअत्यंत तलम मलमल आणि रेशमी कपड्यांपर्यंतच्या वेगळ्या कापड परंपरांचे भांडार आहे.  या वस्त्रांचा प्रत्येक उत्कृष्ट नमुना केवळ कलात्मक कौशल्य दाखवत नाहीतर या प्रतिष्ठित भवनाच्या चिरस्थायी वारशाचा एक मौल्यवान दस्तऐवज देखील आहे.
  5. जनजातीय दर्पण या विविध आदिवासी समुदायांतील सामायिक आणि एकमेकांना जोडणाऱ्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणाऱ्या दालनाचे राष्ट्रपतींनी उद्घाटन केले.या दालनात अनाम आदिवासी स्वातंत्र्य सैनिकहालमा सारखी पारंपरिक नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन पद्धती,डोक्रा कलासंगीत निर्माण करणारी वाद्येगुंजला गोंडी लेखनकृषी आणि घरगुती उपकरणेबांबूच्या टोपल्यावस्त्रेवारलीगोंडी आणि मुद कला वापरून काढलेली चित्रेस्क्रोलमुखवटे आणि दागिनेधातुकामहत्यारेविविध प्रकारचे टॅटू दाखवणारी समकालीन छायाचित्रेपर्यावरणातील व्यवस्था आणि राजदंड इत्यादी दर्शवणारे डायोरामा यांसारख्या विविध संकल्पनांचा समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या सहकार्याने राष्ट्रपती भवन व्यवस्थापनाने हे दालन उभारले आहे.
  6. राष्ट्रपती मुर्मु यांनी आज भारतीय राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवन यांच्या पुनर्विकसित संकेतस्थळाची सुरुवात केली. राष्ट्रपतींचे सचिव राजेश वर्माएनआयसीचे महासंचालक राजेश गेरा तसेच राष्ट्रपती भवन आणि एनआयसी मधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या  गेल्या एक वर्षाच्या काळात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे वर्णन करणारे ई-पुस्तक देखील त्यांनी जारी केले (लिंक: https://rb.nic.in/rbebook.htm)
  7. राष्ट्रपती भवन परिसरातील आयुष स्वास्थ्य केंद्राची माहिती देणाऱ्या ‘प्रीझर्व्हिंग हेल्थएम्ब्रेसिंग ट्रेडीशन्स’ नामक पुस्तकाची पहिली प्रत यावेळी राष्ट्रपती मुर्मु यांना देण्यात आली.

संकेतस्थळाची सुरुवात करण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या सचिवांनी केलेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले की गेल्या एक वर्षात राष्ट्रपती भवन व्यवस्थापनाने विविध नागरिककेंद्री उपक्रम हाती घेतले आहेतउदा. राष्ट्रपती निवासमशोब्रा आणि राष्ट्रपती नीलायम सामान्य जनतेसाठी वर्षभर खुले ठेवणे. यामुळे अमृत उद्यान सुरु असण्याचा कालावधी तसेच नागरिकांना भेटीसाठी देण्यात येणारे टाईम स्लॉट यामध्ये वाढ झाली असे ते म्ह्णाले.राष्ट्रपती भवन परिसरात चौकटीबाहेरील विचारसरणीला प्रोत्सहन देणेएकंदरीतच कार्यपद्धती सुधारणे आणि येथील रहिवासविषयक वातावरण सुधारणे या उद्देशाने येथे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व उपक्रमांना राष्ट्रपती मुर्मु यांनी केलेले मार्गदर्शन आणि पाठींबा याबद्दल सचिवांनी त्यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..