कोटक लाइफ इन्शुरन्स..

कोटक लाइफ इन्शुरन्सतर्फे फ्रंटलाइन टीमचा  सन्मान करण्यासाठी ‘अ‍ॅडव्हायजर्स फॉर लाइफ’ कॅम्पेन लाँच

या कॅम्पेनमध्ये लाखो कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या आणि त्यांची आर्थिक ध्येये साकारण्यासाठी झटणाऱ्या लाइफ अ‍ॅडव्हायजर्स व बँक रिलेशनशीप मॅनेजर्सची दखल घेणाऱ्या 60 सेकंदाच्या दोन फिल्म्सचा समावेश 

मुंबई, 17 जुलै, 2023 – कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.ने (कोटक लाइफ) आज #AdvisorsForLife हे नवे कॅम्पेन लाँच केले आहे. या कॅम्पेनमध्ये दोन डिजिटल फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्म्समध्ये कंपनीचे ‘हम है... हमेशा’ हे तत्व साकार करण्यासाठी ग्राहकांना अखंड सेवा देणाऱ्या लाइफ अ‍ॅडव्हायजर्स (एलए) आणि रिलेशनशीप मॅनेजर्स (आरएम्स) यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला आहे. या कॅम्पेनमधून जीवन विमा क्षेत्रातील या फ्रंटलाइन टीमचे आणि देशाचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी ते देत असलेल्या योगदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. 

या कॅम्पेनमध्ये लाखो लोकांना आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांच्या आर्थिक ध्येयात मदत करण्यासाठी अविरत झटणारे एलए’ज आणि आरएम्स खरेखुरे हिरो असल्याचे दाखवण्यात आले आहे. या फिल्म्स युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनसारख्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. 

कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या मार्केटिंग आणि अलायन्सेस, संस्थात्मक व्यवसाय विभागाचे संयुक्त अध्यक्ष व प्रमुख शुभाशीष घोष म्हणाले, ‘विमा क्षेत्रात येताना ग्राहकांचा सर्वात पहिल्यांदा संपर्क होतो, तो लाइफ अ‍ॅडव्हायजर्स आणि रिलेशनशीप मॅनेजर्स यांच्याशी. बऱ्याचदा त्यांच्याद्वारे पार पाडल्या जाणाऱ्या लक्षणीय भूमिका जसे की, संभावनांना ग्राहकांमध्ये रूपांतरित करणे, ग्राहकांचे भविष्य सुरक्षित करणे तसेच विमा योजनेच्या संपूर्ण कालावधीत ते ग्राहकांना देत असलेली महत्त्वाची सेवा कोणाच्या लक्षात येत नाही. या कॅम्पेनच्या माध्यमातून कोटक लाइफने त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाची दखल घेण्याचे ठरवले आहे. संपूर्ण जीवन विमा क्षेत्राचे हे फ्रंटलाइन टीम सदस्य आमच्या उद्योगाचे खरेखुरे हिरो आहेत.’

कॅम्पेन पाहाण्यासाठी इथे क्लिक करा:

https://youtu.be/EKOlp3Xb0Lc

https://youtu.be/IMdL0IbsGxo 

व्हिडिओ रिलीजसाठी इथे क्लिक करा: (https://youtu.be/hmnNJPoTr4w

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight