'बापल्योक’ साठी नागराज मंजुळे आणि मकरंद माने आले एकत्र

'बापल्योक साठी नागराज मंजुळे आणि मकरंद माने आले एकत्र

आपल्या सशक्त कलाकृतींतून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आणि मकरंद शशिमधू माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतातरोजच्या जगण्याचं प्रतिबिंबसमाजातील वास्तवसोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपलीचित्रपटसृष्टीतील हे दोन मातब्बर दिग्दर्शक आता बापल्योक या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत

मनाला भिडणारं कथानक आणि त्यासाठी आवश्यक असणारे कसदार कलावंत ही या दोघांच्या चित्रपटांची कायमच जमेची बाजू राहिली आहेविशेष म्हणजे बापल्योक या चित्रपटातून बाप आणि लेकाचा भावनिक विषय घेऊन येणाऱ्या दिग्दर्शक मकरंद माने यांच्या साथीला लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे उभे राहिले आहेत२५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्सचे विजय शिंदेआणि बहुरूपी प्रोडक्शन्सच्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाविषयी बोलताना नागराज सांगतात,सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातातअर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतोआजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाहीमकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटलाही  गोष्ट मला भावली आणि मी चित्रपटासाठी पुढाकारघेतला.

तिरक्या रेघेवरच असतं बापल्योकाचं नातंताणलं तर आयुष्यभराचं ताणतं,अन् घावलं तर?...तेच हुडकण्यासाठी आमी समदी एकत्र आलोय’, असं मकरंद माने सांगतात.

बापल्योक चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहेपटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेतगुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहेअजय गोगावलेआनंद शिंदेअभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे.छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहेध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहेवेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहेमुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेतरंगभूषा संतोष डोंगरेकास्टिंग योगेश निकम यांनी केले आहेकार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेतलाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..