मोटोरोलाकडून रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० लाँच

मोटोरोलाकडून रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० लाँच 

अविश्‍वसनीय अशा ५९,९९९ रूपयां पासून सुरू होणाऱ्या सर्वात स्लिमगॅपलेस व जवळपास क्रीजलेस फ्लिप फोन्‍स मुळे  भारतीय स्‍मार्टफोन उद्योगामध्‍ये उत्साह   

  • मोटोरोला रेझर ४० मध्‍ये आहे १४४ हर्ट्झच्‍या रिफ्रेश रेटसह कोणत्‍याही फ्लिप फोनमधील जगातील सर्वात मोठेसर्वात गतीशील व सर्वोच्‍च रिझॉल्‍यूशन ३.६ इंच एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍ले  
  • मोटोरोलाने या नवीन रेझर ४० फॅमिलीसह रिडिझाइन केलेले टीअरड्रॉप हिंज सादर केले आहेजेथे दोन्‍ही रेझर फोन्‍स जगातील सर्वात स्लिम आणि फोल्‍ड केल्यानंतर गॅपलेस फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स ठरतात.  
  • मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० मध्‍ये जवळपास ६.९ इंच क्रीजलेस मेन डिस्‍प्‍लेसह या श्रेणीतील सर्वात गतीशील १६५ हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे.  
  • रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० मध्‍ये उद्योगाला नवी दिशा देणारे फ्लेक्‍स व्‍ह्यू तंत्रज्ञान आहेजे संवाद साधण्यासाठीफोटो कॅप्‍चर करण्‍याचे व क्रिएट करण्‍याचे नवीन पर्याय देतो 
  • मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० मध्‍ये अनुक्रमे स्‍नॅपड्रॅगन ८+ जेन १ आणि स्‍नॅपड्रॅगन ७ जेन १  असे शक्तिशाली प्रोससर्स आहेत.  
  • ग्राहक जवळपास ७,००० रूपयांची त्‍वरित सूट/कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतातज्‍यामुळे फोनची किंमत अनुक्रमे ८२,९९९ रूपये व ५४,९९९ रूपयांपर्यंत कमी होते.  
  • हे फोन्स ३ जुलैपासून प्री-बुक करता येऊ शकतात आणि अॅमेझॉनMotorola.inरिलायन्‍स डिजिटल व आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये १५ जुलैपासून विक्रीला सुरूवात होईल.  
  • मोटोरोलाने या लाँचसाठी ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्हणून क्रिती सेननच्‍या नियुक्‍तीची देखील घोषणा केली.  

जुलै २०२३ – मोटोरोला या भारतातील सर्वोत्तम ५जी स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड आणि फ्लिप फोन्‍ससाठी अग्रमानांकित कंपनीने आज पुन्‍हा एकदा मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० च्‍या लाँचसह भारतीय स्‍मार्टफोन बाजारपेठेत धमाका केला आहे. हे त्‍यांच्‍या रेझर स्‍मार्टफोन्‍स सिरीजमधील नवीन स्‍मार्टफोन्‍स आहेत. या मूळे फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍सची स्क्रिन फ्लिप करण्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व स्‍टाइल-केंद्रित सेल्‍फ-एक्‍स्‍प्रेशन असलेली आयकॉनिक रेझर सिरीजचे पुनरागमन झाले आहे. या नवीन सिरीजमधील प्रत्‍येक वैशिष्‍ट्य इतरांपेक्षा वरचढ दिसण्‍याची आणि आधुनिक फ्लिप फोनचे सर्वोत्तम व्‍हर्जन असण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आधुनिक ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आले आहे. मोटोरोलाने आज शहरामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या लाँच इव्‍हेण्‍टदरम्‍यान  नवीन ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसडर म्‍हणून भारतातील आघाडीची बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सेननच्‍या नियुक्‍तीची देखील घोषणा केली.  

यापैकी सर्वात प्रगत फोन आहे रेझर ४० अल्‍ट्राजो फ्लिप केला असताना उद्योगातील सर्वात सडपातळ फ्लिपेबल स्‍मार्टफोन आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये शक्तिशाली स्‍नॅपड्रॅगन® ८+ जेन १ मोबाइल प्‍लटॅफॉर्मकार्यक्षम बॅटरी आणि कोणत्‍याही फ्लिप फोनच्‍या तुलनेत सर्वात मोठा एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍ले आहे. या अविश्‍वसनीय एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍लेमध्‍ये आकर्षक ३.६ इंच पीओएलईडी स्क्रिन आहेजी बंद असताना देखील विविध अॅप्‍स व फंक्‍शन्‍सना सपोर्ट करण्‍यास पूर्णत: सक्षम आहे. ज्‍यामुळे वापरकर्ते एका दृष्टिक्षेपात अलर्ट पाहू शकतात आणि त्‍यांच्‍यासाठी महत्त्‍वाचे असलेले कन्‍टेन्‍ट प्राप्‍त करू शकतात. वापरकर्ते या मोठ्या एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍लेवर मेसेजेसना प्रतिसाद देऊ शकतातसेल्‍फी घेऊ शकतातदिशा मिळवू शकतातगेम्‍स खेळू शकतातस्‍पॉटिफायवर गाणी ऐकू शकतात आणि यूट्यूबवर व्हिडिओज पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतात. तसेच हे एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍ले १४४ हर्ट्झ ॲडप्टिव्‍ह रिफ्रेश रेटसह सर्वात स्‍मूद आहेज्‍यामुळे सुलभपपणे ॲप्‍स स्विच करता येतात आणि वेबसाइट्स एकसंधीपणे स्‍क्रॉल करता येतात. हे एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍ले ११०० नीट्स ब्राइटनेससह येतेज्‍यामुळे बाहेर असताना देखील स्क्रिनवरील चित्र सुस्‍पष्‍टपणे दिसते. तसेच या डिस्‍प्‍लेवर कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास विक्‍टस प्रोटेक्‍शन आहेज्‍यामधून अधिक वापरानंतर देखील टिकाऊपणाची खात्री मिळते. तसेच एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍लेमध्‍ये सर्वोच्‍च दर्जाचे रिझॉल्‍यूशन आहे१० बीट व १०० टक्‍के डीसीआय-पी३ वैशिष्‍ट्यांमुळे वास्‍तविक रंगसंगती अनुभवायला मिळतेज्‍यामुळे व्‍युईंग अनुभव मिळतो. हा मोठा एक्‍स्‍टर्नल डिस्‍प्‍ले ग्राहकांना कन्‍टेन्‍ट निर्मितीपासून मेकअप करण्‍यापर्यंत किंवा सेल्‍फी काढण्‍यापूर्वी स्‍वत:चे लुक पाहण्‍यापर्यंत अनेक प्रकारे वापरता येईल.  

फक्‍त एवढेच नाहीमोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा स्‍मार्टफोन फ्लिप ओपन केले असता जवळपास क्रीजलेस व अल्‍ट्रा-स्‍मूद डिस्‍प्‍ले पाहायला मिळतोज्‍यामध्ये वैविध्‍यपूर्ण ६.९ इंच पीओएलईडी स्क्रिनसह १६५ हर्ट्झचे सर्वोच्‍च स्क्रिन रिफ्रेश रेट आणि १४०० नीट्सचा सर्वोच्‍च ब्राइटनेस आहेज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना फोन पूर्णपणे उघडला असताना सर्वोत्तम स्‍मार्टफोन अनुभव मिळतो. मोटोरोला रेझर ४० मध्‍ये देखील अशाच प्रकारच्‍या डिस्‍प्‍ले कन्फिग्‍युरेशनसह १४४ हर्ट्झचे सर्वोच्‍च रिफ्रेश रेट आहेज्‍यामुळे हा स्‍मार्टफोन देखील अत्‍यंत स्‍मू आहे. 

डिझाइनच्‍या संदर्भात मोटोरोला यापूर्वीच्‍या आयकॉनिक डिवाईसेसना आधुनिक स्थिर डिझाइनमध्‍ये सादर करत आहे. रेझर ४० अल्‍ट्रा निम्‍म्‍यामध्‍येच पूर्णपणे फोल्‍ड होतोवरील व खालील कडा एकसंधीपणे एकमेकांशी जुळून गॅपलेसअल्‍ट्रा-थिन व स्‍लीक लुक देतात. इतर फ्लिप फोन्‍सच्‍या तुलनेत रेझर ४० अल्‍ट्राच्‍या स्क्रिनवर कोणतेही व्हिजिबल क्रीज नाहीज्‍याचे श्रेय रिडिझाइन केलेल्‍या टीअरड्रॉप बिंजला जाते. तसेच या डिवाईसमध्‍ये उद्योगातील अग्रणी ड्युअल-ॲक्सिस ट्रॅकिंग आहेजे डिवाईसचा आकार कमी करतेज्‍यामुळे फ्लिप बंद केले असताना दोन्‍ही रेझर फोन्‍स जगातील स्लिमेस्‍ट फ्लिपेबल फोन आहेत. रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० च्‍या आयकॉनिक डिझाइनमध्‍ये मेटल फ्रेमसह मागील बाजूस प्रिमिअम वेगन लेदरचे आवरण  आहेज्‍यामुळे हे डिवाईसेस सहजपणे हातामध्‍ये मावतात आणि स्क्रिनवर नाजूक स्‍पर्शाची खात्री मिळते.  

स्‍मार्टफोन अनुभवाला पुनर्परिभाषित करत रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० मध्‍ये फ्लेक्‍स व्‍ह्यू तंत्रज्ञान आहेजे संवाद साधण्‍यासाठीफोटो कॅप्‍चर करण्‍यासाठी व क्रिएट करण्‍यासाठी नवीन मार्ग देते. वापरकर्ते कन्‍टेन्‍ट पाहण्‍यासाठीमित्रांसोबत व्हिडिओ चॅटिंग करण्‍यासाठी सहजपणे डिवाईस वळवू शकतात. हा डिवाईस स्थिर ठेवला असता वापरकर्त्‍यांना परिपूर्ण फोटोजतसेच गेस्‍चर कॅप्‍चर व ऑटो-स्‍माइल कॅप्‍चरचा वापर करत परिपूर्ण पोज कॅप्‍चर करण्‍यास मदत करतो. या डिवाईसमध्‍ये अनेक उच्‍चस्‍तरीय स्‍मार्टफोन वैशिष्‍ट्ये आहेत आणि म्‍हणून हा डिवाईस इतरांपेक्षा वरचढ दिसण्‍याची इच्‍छा असलेले ट्रेण्‍डसेटर्स व टेस्‍टमेकर्ससाठीतसेच डिवाईसला डिस्‍कनेक्‍ट करून त्‍यावर नियंत्रण ठेवण्‍याची इच्‍छा असलेले डिजिटल मिनिमॅलिस्‍ट्स यांच्‍यासाठी उपयुक्‍त आहे.  

कॅमेऱ्यासंदर्भात मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा मध्‍ये शक्तिशाली १२ मेगापिक्‍सल मेन कॅमेरा सेन्‍सर आहे. इन्‍स्‍टण्‍ट ड्युअल पिक्‍सल पीडीएएफचा वापर करत अंधुक प्रकाशात देखील जलदपणेअधिक सुस्‍पष्‍ट फोटोज कॅप्‍चर करता येतात. व्‍यापक एफ/१.५ अपेर्चर लेन्‍ससह ओआयएसचे संयोजन नको असलेल्‍या शेक्‍सना दूर करते आणि आकर्षक सॉफ्ट-फोकस पार्श्‍वभूमींसह फोटो कॅप्‍चर करते. हा डिवाईस नेहमी व्‍यस्‍त असलेल्‍या आणि आकर्षक फोटोज कॅप्‍चर करून शेअर करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या कन्‍टेन्‍ट क्रिएटर्ससाठी परिपूर्ण आहे. रेझर ४० अल्‍ट्रामध्‍ये अधिक सुस्‍पष्‍टपणे फूटेज कॅप्‍चर करण्‍याकरिता व्हिडिओसाठी नाइट व्हिजन मोड आहेजे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे व्हिडिओज कॅप्‍चर करते. कॅमेऱ्यामध्‍ये १३ मेगापिक्‍सल अल्‍ट्रावाइड + माक्रो व्हिजन लेन्‍स आहेजी व्‍यापक फोटोज कॅप्‍चर करते आणि प्रमाणित लेन्‍सच्‍या तुलनेत फ्रेममध्‍ये ३ पट अधिक आहे. वापरकर्ते रेझर ४० अल्‍ट्रा फ्लिप ओपन करू शकतात आणि सेल्‍फीज व व्हिडिओ कॉलसाठी ३२ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा वापरू शकतात किंवा फोनला परिपूर्ण सेल्‍फीसाठी योग्‍य व्‍ह्यूमध्‍ये फोल्‍ड करू शकतात. तसेच वापरकर्ते जलद मेकअपसाठी किंवा लाइव्‍ह असण्‍यासाठी मिरर म्‍हणून उच्‍च दर्जाचा कॅमेरा व व्‍यापक डिस्‍प्‍लेचा वापर करू शकतात. मोटोरोला रेझर ४० मध्‍ये कोणत्‍याही मोटोरोला फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍सच्‍या तुलनेत सर्वोच्‍च रिझॉल्‍यूशन सेन्‍सर आहे. डिवाईसमध्‍ये ६४ मेगापिक्‍सल मेन कॅमेरासह ओआयएसमागील बाजूस१३ मेगापिक्‍सल अल्‍ट्रावाइड + मागील बाजूस माक्रो व्हिजन लेन्‍स आणि पुढील बाजूस ३२ मेगापिक्‍सल कॅमेरा आहेजे उल्‍लेखनीय फोटोज कॅप्‍चर करण्‍यासह उच्‍च दर्जाच्‍या व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देते. 

या वैशिष्‍ट्यांमध्‍ये अधिक भर म्‍हणजे शक्तिशाली स्‍नॅपड्रॅगन ८+ जेन १ प्रोसेसरजो प्रगत एआय व जलद रिफ्रेश रेट्स आणि ५जी कनेक्‍शन्‍ससह येतो. मोटोरोला रेझर ४० मध्‍ये ४ एनएम प्‍लॅटफॉर्मवर आधारित स्‍नॅपड्रॅगन ७ जेन १ ची शक्‍ती आहे. मल्‍टी-मीडियाच्‍या बाबतीत रेझर ४० अल्‍ट्रामध्‍ये आकर्षक डिस्‍प्‍ले आहेतसेच सुधारित ऑडिओ अनुभवासाठी डॉल्‍बी ॲटमॉस आहे. ज्‍यामुळे वापरकर्ते आता अपवादात्‍मक व्हिज्‍युअल्‍सचा आनंद घेण्‍यासोबत बहु-आयामी साऊंडचा देखील अनुभव घेऊ शकतातजे अधिक सुस्‍पष्‍टताडिटेल व डेप्‍थ देते. मोटोच्‍या नवीन स्‍पॅटियल साऊंडसह साऊंड अधिक मोठा ऐकायला येतो आणि वापरकर्त्‍यांचे आसपासचे वातावरण उत्‍साहित करतोमग ते संगीत ऐकत असो किंवा त्‍यांचे आवडते चित्रपट पाहत असो सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद मिळतो. बॅटरीसंदर्भात रेझर ४० अल्‍ट्रामध्‍ये अत्‍यंत गतीशील ३३ वॅट टर्बोपॉवर चार्जर आहेजो बॉक्‍ससोबत येतो आणि वायरलेस चार्जिंग असण्‍यासोबत ३८०० एमएच दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी आहे. ही बॅटरी क्षमता रेझरच्‍या पूर्वीच्‍या जनरेशनपेक्षा मोठी आहेतसेच मोटोरोला रेझर ४० मध्‍ये विशाल ४२०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. 

या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत मोटोरोला एशिया पॅसिफिकचे कार्यकारी संचालक श्री. प्रशांत मणी म्‍हणाले, ‘‘मोटोरोला तंत्रज्ञान व नाविन्‍यतेसंदर्भात अग्रणी आहे. आम्‍हाला बाजारपेठेत धुमाकूळ घालण्याची  आमची परंपरा कायम राखत आणि प्रत्‍येक उत्‍पादनासह स्‍तर उंचावत आयकॉनिक रेझर श्रेणितील दोन नवीन स्‍मार्टफोन्‍स लाँच करण्‍याचा अभिमान वाटतो. या अत्‍याधुनिक डिवाईसेसमधून मर्यादांना दूर करण्‍याचे आमचे निरंतर प्रयत्‍न दिसून येतातज्‍यामध्‍ये उत्तम डिझाइनउल्‍लेखनीय कार्यक्षमता व अद्वितीय वापराची गुणवत्ता सामावलेली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की,रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍सच्‍या भविष्‍याला आकार देतील आणि आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांच्‍या अपेक्षांची पूर्तता करतील.’’ 

उत्‍पादनाच्‍या उपलब्‍धतेबाबत सांगताना ॲमेझॉन इंडियाच्‍या वायरलेस ॲण्‍ड होम एंटरटेन्‍मेंटचे संचालक श्री. रणजित बाबू म्‍हणाले, ''ॲमेझॉनमध्‍ये आम्‍ही नेहमी ग्राहकांना प्रथम प्राधान्‍य दिले आहे. आम्‍ही ग्राहकांच्‍या गरजा व इच्‍छा जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करतोतसेच त्‍यांचा अनुभव वाढवण्‍याचे मार्ग शोधण्‍याचा देखील प्रयत्‍न करतो. आमचा विश्‍वास आहे की, उच्‍च दर्जाच्‍या उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी प्रदान करणे हा दृष्टिकोन संपादित करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. आणि आज रेझर ४० सिरीजच्‍या लाँचसह आम्‍ही त्‍या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. आम्‍हाला प्राइम डेला मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा लाँच करण्‍याचा अभिमान वाटतो. आम्‍ही आमच्‍या प्रिमि‍अम स्‍मार्टफोन श्रेणीमध्‍ये ही उत्‍साहवर्धक भर करत ग्राहकांना आनंदित करण्‍यास उत्‍सुक आहोत.'' 

मोटोरोलाने नवीन रेझर ४० अल्‍ट्रामध्‍ये पॅन्‍टोन कलर ऑफ द इअर २०२३ सह आकर्षक रंगसंगतीची भर केली आहेप्रिमिअम वेगन देलर डिझाइनमध्‍ये विवा मॅग्‍नेटा रंग आहेजो मोटोरोला डिवाईसेससाठी खास आहे. तसेच इन्फानाइट ब्‍लॅकसह मॅट फिनिश ग्‍लास बॉडीचा पर्याय आहे. मोटोरोला रेझर ४० प्रिमिअम वेगन लेदर फिनिशसह तीन आकर्षक रंग: सॅगे ग्रीनकन्‍टेम्‍पररी ग्रीन टोनवॅनिला क्रीमअस्‍सल ऑफ-व्‍हाइट क्‍लासिक व समर लिलाक या रंगांमध्‍ये येतोजी मिस्टिकल पर्पल शेड आहे.  

दोन्‍ही डिवाईसेस अँड्रॉईड १३ वर संचालित आहेत आणि ३ ओएस अपग्रेड्स व ४ वर्षांच्‍या सिक्‍युरिटी पॅचेससह गरजेनुसार उपलब्‍ध वैयक्तिकृत वैशिष्‍ट्यांसहयेतात. सिग्‍नेचर मोटोरोला अनुभव जसे सिम्‍पल गेस्‍चर्स व सानुकूल मनोरंजन सेटिंग्‍ज देखील उपलब्‍ध आहेत. तसेचरेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० व्‍यापक सुरक्षितता वैशिष्‍ट्ये देतातज्‍यामध्‍ये थिंकशील्‍डमोटो सेक्‍युअर व मोटो कीसेफ यांचा समोवश आहे.  

उपलब्‍धता व किंमत  

मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा ८९,९९९ रूपयांच्‍या लाँच किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असेलतर मोटोरोला रेझर ४० ५९,९९९ रूपयांच्‍या लाँच किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. 

स्‍मार्टफोन्‍सची विक्री ॲमेझॉनMotorola.inरिलायन्‍स डिजिटल आणि इतर आघाडीच्‍या रिटेल स्‍टोअर्समध्‍ये १५ जुलै २०२३ दुपारी १२ वाजता सुरू होईल. दोन्‍ही स्‍मार्टफोन्‍स १५ जुलै २०२३ पासून सुरू होणाऱ्या अॅमेझॉन स्‍पेशल्‍सवरील प्राइम डेचा भाग आहेत.   

मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा Amazon.in वर ३ जुलै सायंकाळी ६ वाजल्‍यापासून प्री-बुकिंगसाठी देखील उपलब्‍ध असेल.  

उत्‍पादनाबाबत अधिक माहितीसाठी भेट द्या:https://www.motorola.in/smartphones-motorola-razr-2023-all 

उत्‍पादनाबाबत सविस्‍तर माहिती ॲमेझॉनवर खालील लिंक्‍सच्‍या माध्‍यमातून देखील उपलब्‍ध आहे: 

मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा –https://www.amazon.in/b?node=84732875031 

मोटोरोला रझर ४० - https://www.amazon.in/b?node=84732875031 

उपलब्‍धता ऑफर्स:  

ग्राहक डिवाईस खरेदी करण्‍यासाठी खालील दोन ऑफर्समधून निवड करू शकतात: 

मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रासाठी:  

  1. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७,००० रूपयांची इन्‍स्‍टण्‍ट कॅशबॅक/सूटज्‍यामुळे उत्‍पादनाची किंमत ८२,९९९ रूपयांपर्यंत कमी होते.  
  2. एचडीएफसी बँकेवर^ जवळपास १२ महिन्‍यांपर्यंत आणि इतर आघाडीच्‍या बँकांवर जवळपास ९ महिन्‍यांपर्यंत नो कॉस्‍ट ईएमआयज्‍यामुळे मालकी हक्काचा खर्च प्रतिमहिना ७,५०० रूपयांपासून सुरू हातो.  

मोटोरोला रेझर ४० साठी: 

  1. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५,००० रूपयांची इन्‍स्‍टण्‍ट कॅशबॅक/सूटज्‍यामुळे उत्‍पादनाची किंमत ५४,९९९ रूपयांपर्यंत कमी होते. 
  2. तसेचग्राहक जुन्‍या डिवाईसच्‍या एक्‍स्‍चेंज मूल्‍यावर ,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बम्‍प अप ऑफरचा लाभ घेऊ शकतात.  
  3. एचडीएफसी बँकेवर^ जवळपास १२ महिन्‍यांपर्यंत आणि इतर आघाडीच्‍या बँकांवर जवळपास ९ महिन्‍यांपर्यंत नो कॉस्‍ट ईएमआयज्‍यामुळे मालकीहककाचा खर्च प्रतिमहिना ५,००० रूपयांपासून सुरू हातो. 

^फक्‍त ॲमेझॉनवर  ऑपरेटर ऑफर्स: 

रिलायन्‍स जिओ ऑफर: मोटोरोला रेझर ४० अल्‍ट्रा व रेझर ४० या दोन्‍ही डिवाईसेसवर १५,००० रूपयांचे बेनीफिट्स  

  1. ३५६४ रूपयांचे ३६ महिन्‍यांसाठी ९९ रूपयांचे वाऊचर्स  
  2. प्रतिजीबी १० रूपयांमध्‍ये ३६ महिन्‍यांसाठी प्रतिमहिना अतिरिक्‍त १० जीबी ५जी डेटा  
  3. अजिओयात्राईटी प्राइम व झूमइन यासारख्‍या ॲप्‍सवर ८२०० रूपयांमध्‍ये ट्रॅव्‍हलशॉपिंग व लाइफस्‍टाइल ऑफर्स  

ऑफरबाबत अधिक माहितीसाठी: www.jio.com/en-in/jio-motorola-razr40-offer-2023 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO