'थकाबाई' चित्रपटाचे पोस्टर लॉच..

सावधान....थकाबाई येत आहे !

'थकाबाई' चित्रपटाचे पोस्टर लॉच

रहस्यमयी आणि गूढ चित्रपटांना मराठी प्रेक्षक कायमच पसंती देतात, असाच एक रहस्यमयी चित्रपट नवोदित दिग्दर्शक युवीन कापसे घेऊन येत आहेत. ‘थकाबाई’ असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाचे पोस्टर लाँच नुकतेच बांद्रा येथील शॉ किया शोरूममध्ये पार पडले. नावातच रहस्य असलेल्या चित्रपटात शुभंकर तावडे आणि हेमल इंगळे मुख्य भूमिकेत दिसतील तर अभिनेते मीर सरवर एका विशेष भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर त्याच्या विषयासारखेच रहस्यमयी त्यावर शुभंकर तावडेचा एक भयावह लूक त्याच्या उग्र हावभावांसह या पोस्टरवर दिसतोय. तर हेमल इंगळे रहस्याचा शोध घेणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या हातात कंदिल असून ती जंगलात काहीतरी शोधतेय अशी मुद्रा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘सत्य की असत्य थकाबाई: जाणे रहस्य’ या नावातच असलेल्या टॅगलाईनमुळे  नक्की चित्रपटात काय असेल? थकाबाई म्हणजे नक्की कोण? आणि तिचं काय रहस्य आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 

सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च प्रसंगी अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable