शंतनू देशपांडे यांची मिशेलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

शंतनू देशपांडे यांची मिशेलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

मुंबई, 18 जुलै 2023: मिशेलिनने शंतनू देशपांडे यांची मिशेलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केली. शंतनू पुण्यात राहणार आहेत. मिशेलिन सोबतच्या 23 वर्षांच्या कार्यकाळात, शंतनूने भारतात आणि उत्तर अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशिया यांसारख्या इतर भौगोलिक क्षेत्रांमध्ये विक्री आणि विपणन क्षेत्रात विविध नेतृत्व भूमिका निभावल्या आहेत.

 शंतनू 1999 मध्ये मिशेलिन इंडियामध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून रुजू झाले. 2007 मध्ये त्यांची इंडिया मार्केटिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या भूमिकेत त्यांनी कंपनीची उपस्थिती देशात प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
2012 ते 2015 पर्यंत, शंतनू यांनी उत्तर अमेरिकेतील मिशेलिन उपकंपनीसह विपणन उपाध्यक्ष म्हणून काम केले. ते 2015 ते 2020 पर्यंत आफ्रिका, भारत आणि मध्य पूर्व क्षेत्रासाठी विपणन B2B व्यवसायाचे संचालक होते. 2020 पासून, शंतनू यांनी बँकॉक स्थित मिशेलिन ग्रुपच्या अर्बन बिझनेस लाइनसाठी ग्लोबल मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम केले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..