पंच कृती - फाइव्ह एलिमेंट्स' चित्रपटातील 'मन बावरा' गाणे रिलीज

 पंच कृती - फाइव्ह एलिमेंट्स' चित्रपटातील 'मन बावरा' गाणे रिलीज

'पंच कृती - फाइव्ह एलिमेंट्स' या चित्रपटातील सागर वाही आणि सारिका भरोलिया या जोडीचे 'मन बावरा' हे रोमॅंटीक गाणे रिलीज झाले असून आता ते UBON म्युझिक चॅनलवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मनातील प्रेमाच्या भावना जागृत करणारे हे गाणे नक्कीच श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारे आहे.

  'मन बावरा' गाण्याची धून इतकी आकर्षक आहे की हे गाणे प्रत्येकामध्ये एक नवा उत्साह निर्माण करेल. या गाण्यात ग्रामीण भारतातील परंपरांचा पहायला मिळेल. या गाण्याचे शूटिंग मध्य प्रदेशातील सुंदर अशा निसर्गरम्य भागात असलेल्या बुंदेलखंडमधील चंदेरी शहरात झाले आहे. 'मन बावरा' हे गाणे राजेश सोनी यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. या चित्रपटात राजेश सोनी यांनी आणखी एक गाणे संगीतबध्द  केले आहे जे बुंदेलखंडच्या लोकगीतांवर आधारित आहे आणि ते देखील प्रेक्षकांना पसंतीस उतरला.

'मन बावरा' हे गाणे सुप्रसिद्ध गायक मनीष शर्मा यांनी गायले आहे. या गाण्यात सागर वाही, सारिका भरोलिया हे एक प्रेमी जोडप्याची भूमिका साकारत आहे आणि या गाण्यात ते एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. प्रेम ही  भावना व्यक्त करताना हे प्रेम असेच कायम चिकून राहण्याकरिता ते देवासमोर प्रार्थना देखील करतात. त्याची एक झलक या गाण्यात पाहायला मिळणार आहे.

आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक मनीष शर्मा सांगतात की, मला खात्री आहे की प्रेक्षकांना 'मन बावरा' हे गाणे खूप आवडेल. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी देखील हे गाणं गाताना मला खूप मजा आली. हे गाणं इतकं आकर्षक गाणं आहे की ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. हे गाणे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबद्दल असलेल्या तुमच्या भावना व्यक्त करण्यासएक वेगळीच प्रेरणा देते. गाण्याचे बोल असे आहेत की त्यातूनच प्रेमाची भावना सहजपणे व्यक्त होते.
'पंच कृती - फाइव्ह एलिमेंट्स'मध्ये ब्रिजेंद्र काला, पूर्वा पराग, उमेश बाजपेयी, सागर वाही, सारिका भरोलिया, कुरंगी नागराज, हरवीर आणि रुहाना खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय भार्गव यांनी केले आहे, तर UBON व्हिजन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली हरिप्रिया भार्गव आणि संजय भार्गव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हा चित्रपट 4 ऑगस्ट रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर देशभरातील सर्वच नागरिकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री  चित्रपटाच्या संपुर्ण टीमला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight