जिओ स्टुडिओजच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच..

जिओ स्टुडिओजच्या "बाईपण भारी देवा" चित्रपटाची बॉक्स आँफिसवर घोडदौड सुरुच..दोन आठवड्यात केली तब्बल ३७.३५ कोटीची कमाई.. 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि  केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.  सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून 'बाईपण भारी देवा' चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात  बॉक्स ऑफिसवर तब्बल १२.५० कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही तर प्रदर्शनाच्या दुसऱ्याच रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींचा गल्ला जमवत एकूण ३७.३५ कोटींची कमाई केली आहे.  म्हणजेच पाहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवडयाची कमाई डबल!.  चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी थिएटरमधील गर्दी ओसरलेली दिसत नाही.  चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकवर्गाकडून मिळणारी प्रसिद्धी पाहता तिसऱ्या आठवड्यातही आपली हुकमत कायम ठेवत , हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलं नाणं खणखणीत वाजविण्यात यशस्वी झालाय असं म्हणणं नाकारता येत नाही

जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि  जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन्   दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून आलं.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight