आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) चा दक्षिण आशियात विस्तार; डिस्टन्स लर्निंग प्रोग्रामकरिता दिल्ली पब्लिक स्कूल, बिराटनगर, नेपाळ सोबत भागीदारी
 डीपीएस बिराटनगरच्या विद्यार्थ्यांसमवेत आकाश डीएलपी शेअर करणार स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज 
26 मे, 2020 – परदेशातील विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यासाठी मदत करण्याच्या कंपनीच्या उद्देशात आपले पहिले पाऊल उचलण्याच्या प्रयत्नात परीक्षांचा सराव करून घेणारे भारतातील अग्रगण्य आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) ने दक्षिण आशिया (भारताबाहेरील) आपला विस्तार वाढवत नेपाळच्या बिराटनगर येथील सर्वात नामांकीत अशा दिल्ली पब्लिक स्कूलसमवेत धोरणात्मक भागीदारीत प्रवेश केला आहे. या माध्यमामुळे आता इयत्ता VIII-XII विद्यार्थ्यांना डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम (डीएलपी) उपलब्ध होणार आहे.     
हिमालयात असणाऱ्या देशामधील शैक्षणिक संस्थेसोबत ही एईएसएल’ची पहिली भागीदारी ठरली असून जिथे आधीपासून विद्यार्थ्यांना डिजीटल अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात.  
या भागीदारीत आकाशद्वारे इयत्ता VIII, IX, X, आणि XII च्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा “डीएलपी” अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे तर इयत्ता XI च्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा “डीएलपी” अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येतो आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी यासाठी एईएसएलद्वारे आवश्यक पुस्तके आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे जेईई मेन, जेईई ॲडव्हान्स आणि एनईईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करायला साह्य होणार आहे.  
एनसीईआरटी, एईएसएल समांतर गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्य पुरवण्याशिवाय एईएसएल निवडक विषयांवर ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि वेबिनारचे आयोजन करणार आहे. ऑनलाइन शंका निरसन सुविधेतंर्गत प्रत्येक विद्यार्थी दरदिवशी 5 प्रश्न विचारू शकतो. ही सुविधा या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिस्तशीर पद्धतीने ऑनलाइन चाचणी वातावरणाची ओळख करून देणारा ठरेल. याद्वारे विद्यार्थी प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा याविषयीचे चतुर व्यवस्थापन करू शकतात, त्यांच्या परीक्षा-चाचणी रणनितीचे मूल्यांकन आणि वेळेच्या उत्पादनक्षमतेचे विश्लेषण शक्य होणार आहे.  
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम प्रमुख चंद्र शेखर मिश्रा म्हणाले की, “भारताबाहेरील नेपाळ, बिराटनगर भागातील दिल्ली पब्लिक स्कूल सोबतची हातमिळवणी ही एखाद्या दक्षिण आशियातील शैक्षणिक संस्थेसोबतची पहिली भागीदारी आहे. सध्याचे स्पर्धात्मक वातावरण आणि बदलती शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊनच आम्ही डीपीएस, बिराटनगर येथील विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सर्वोत्तम मंच उपलब्ध करून दिलेला आहे. भारताबाहेरील विद्यार्थ्यांना शिक्षण सहभागाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना साह्य करण्याची बांधिलकी जपणे या भागीदारीमुळे शक्य झाले आहे.”
याविषयी बोलताना दिल्ली पब्लिक स्कूल, बिराटनगर, नेपाळचे प्रिन्सिपल परशू राम घिमीरे म्हणाले की, “एनईईटी, जेईई (मेन आणि ॲडव्हान्स), बीआयटीएसएटी आणि पदवी-पश्चात अभ्यासक्रमांची अन्य राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा, इतकेच नव्हे तर एनयीएसई, केव्हीपीव्हाय आणि ऑलिम्पियाडसारख्या शाळा मंडळे व कनिष्ठ स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणाऱ्या शिक्षण पद्धती एईएसएलने तयार केल्याबद्दल दिल्ली पब्लिक स्कूल बिराटनगरचा आनंद ओसंडून वाहतो आहे. आम्ही त्यांची अभ्यास पद्धत अवलंबण्याकरिता उत्सुक आहोत. एईएसएल आणि डीपीएस बिराटनगरची ही भागीदारी विद्यार्थ्यांसाठी निकालाभिमुख (रिझल्ट ओरियंट) सिद्ध होईल असा मला विश्वास आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश पालक आणि शिक्षक वर्गाला निश्चितच सर्वोच्च समाधान देणारे ठरेल."

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..