अमेझॉन प्राइम वीडियोवर जगभरात प्रिमियर होणारा पहिला तामिळ चित्रपट ‘पोनमगल वंधल’
अमेझॉन प्राइम वीडियोवर पहिल्यांदाच पार पडला तामिळ चित्रपट ‘पोनमगल वंधल’चा डिजिटल प्रीमिअर !
अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पहिल्यांदाच एका बहुचर्चित ‘पोनमगल वंधल’ या तामिळ चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर पार पडला.
चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, अशातऱ्हेन चित्रपटाचे डिजिटल प्रीमिअर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाचे निर्माते सुपरस्टार सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका यांच्यासोबत दक्षिण चित्रपट उद्योगातील अभिनेते, निर्देशक आणि अन्य प्रमुख व्यक्ती या डिजिटल प्रीमिअरचा भाग झाले होते. आणि यातील कलाकारांच्या अभिनयाने अतिशय प्रभावित झाले. प्रसिद्ध निर्देशक एटली, निर्देशक हालिथा शमीन, आनंद के.वी. आदी अनेक मान्यवरांनी चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर आपल्या सोशल मध्यमावरून या चित्रपटाचे कौतुक केले. हा चित्रपट २९ मे पासून सर्व प्राईम सदस्यांसाठी अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर उपलब्ध असणार आहे.
वास्तविक पाहता चित्रपट उद्योगासाठी हा एक महत्वपूर्ण दिवस आहे, की ज्यातऱ्हेने ‘पोनमगल वंधल’ या चित्रपटाच्या वर्चुअल प्रीमियरच्या निमित्ताने एक ट्रेंड तयार होत आहे. चित्रपटाच्या स्क्रिनर लिंकला या मुख्य अतिथींसोबत शेअर करण्यात आले होते ज्यामध्ये के. भाकीराज, आर. पार्थीबन, पंडिराजन, प्रताप पोथन, त्यागराजन, सत्यराज, भारतीराजा, रेवती, अल्टी यांच्यासोबत इत्यादी अनेक नामवंत या वर्चुअल मेगा-इवेंटचा भाग बनले होते.
‘पोनमगल वंधल’ ज्योतिका आणि सूर्या यांचे बॅनर 2 डी एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. या कोर्टरूम ड्रामामध्ये ज्योतिका एका पॉवरपॅक परफॉर्मेंससोबत एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याची चर्चा या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रसिद्धीपासूनच होते आहे. या चित्रपटाचे निर्माता सूर्या शिवकुमार असून चित्रपटाचे दिग्दर्शन जे जे फ्रेड्रिक यांनी केले आहे. अमेझॉन प्राइम वीडियोवर संपूर्ण जगभरात प्रीमियर होणारा पहिला तामिळ चित्रपट असून 200 हून अधिक देश आणि भागांमध्ये 29 मे पासून प्राइम सदस्यांना पाहता येईल.
Comments
Post a Comment