'क्रिश ४' मध्ये अवतरणार निळ्या डोळ्यांचा 'जादू', ह्रतिकने दिले संकेत !
असे वाटतेय की, ऋतिक रोशन आणि त्यांची यशस्वी ठरलेली सुपर हीरो फ्रेंचाइजी क्रिश च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा चौथा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या फ्रैंचाइज़ीची सुरुवात 'कोई ... मिल गया' पासून झाली होती ज्यामध्ये एक मानव आणि एक एलियन यांच्यामधल्या सुंदर मैत्रीला दाखवण्यात आले होते.
हृतिक रोशनने ट्विटरवर एका चाहत्याच्या ट्विटला एक मजेदार उत्तर देताना 'जादू' च्या परतण्याचे संकेत देत प्रशासकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. नुकत्याच बैंगलोरमध्ये एक अप्राकृतिक आवाज़ ऐकण्यात आला होता ज्याबद्दल ट्विटर एका चाहत्याने ऋतिकला विचारले कि त्याने चुकून पुन्हा एकदा एलियंसला पृथ्वीवर बोलावले नाहीये ना. याचे ऋतिकने मज़ेदार उत्तर देत प्रशंसकांना आश्चर्यचकित केले की जादू ची प्रिय व्यक्तिरेखा त्याच्या जीवनात पुन्हा यायला उत्सुक आहे. त्याने म्हटले, "ही चूक नाही. ही योग्य वेळ आहे".
हृतिकच्या या ट्वीटनंतर , निळ्या डोळ्यांचा एलियन जादूला पुढच्या भागात आणण्याबाबत चाहत्यांचे आडाखे बांधणे सुरु केले आहे. यावर अजूनपर्यंत ऋतिक किंवा निर्मात्यांकडून प्रत्यक्ष दुजोरा मिळाला नसला तरी अभिनेत्याचे शब्द बरेच काही सूचित करून जातात. जादू, एका दशकाहूनही अधिक काळ बॉलिवूडचे सर्वात लाडके पात्र राहिले आहे. ही व्यक्तिरेखा इतकी प्रेमळ आहे कि लहान मुलांपासून तरुण आणि वृद्धांची सुद्धा अतिशय लाडकी आहे. जर ही बातमी खरी असेल तर ती 'कोई ... मिल गया' आणि 'क्रिश'च्या सर्व चाहत्यांसाठी खूप मोठी मनोरंजनाची मेजवानी असेल. 
ऋतिक रोशन अभिनीत 'क्रिश' फ्रैंचाइजी नेहमीच बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक राहिली आहे कारण ही भारतातली सर्वात मोठी आणि एकमात्र यशस्वी सुपरहीरो फिल्म राहिली आहे. निळ्या डोळ्यांचा एलियन जादू च्या येण्याच्या खऱ्या खोट्या बातमीने चाहत्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचला आहे, हे मात्र  नक्की.

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..