लॉकडाऊनमध्ये सलमानने ईदच्या निमित्ताने स्वत:चं युट्यूब चॅनल लॉन्च केले..

सलमान खानने ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी केले नवे गाणे रिलीज !
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करतो. दशकभरापासून सलमानने ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या वर्षी देखील सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. तसेच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाचे प्रदर्शन देखील लांबले आहे. त्यामुळे सलमानचे चाहते नाराज आहेत. चाहत्यांना खूश करण्यासाठी नवा म्युझिक व्हिडिओ  'भाई भाई' लॉन्च केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
महामारीच्या या संकटात आपल्या चाहत्यांना निराश न करण्यासाठी, अभिनेत्याने पनवेलमधील आपल्या फार्महाउसवर कमीतकमी क्रू आणि साधनांसोबत 'भाई भाई' साठी शूटिंग केले आहे. अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या खास गाण्याला प्रदर्शित केले आणि लिहिले," मी आपल्यासाठी काहीतरी बनवले आहे बघून सांगा कसे वाटले...तुम्हाला सर्वांना ईद मुबारक.....#BhaiBhai"
आपल्या सर्व चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना, सुपरस्टार सलमान खान ने लिहिले की, या वर्षी ईदच्या मुहूर्तावर आम्ही आपली फिल्म नाही प्रदर्शित करू शकलो मात्र तरीही माझ्या चाहत्यांसाठी मी एका विशेष गाण्यावर काम केले आहे. या गाण्याचे नाव 'भाई भाई' असून हे गाणे बंधुता आणि एकता या भावनांना उजागर करते. आणि या गाण्यासाठी ईद हा सर्वात चांगला दिवस आहे कारण हा एक असा सण आहे जो सर्वांना जवळ आणतो. मला आशा आहे की तुम्हाला हे गाणे ऐकताना तेवढीच मजा येईल जेवढी मजा मला हे गाणे करताना आली आहे.
हे गाणे एक महत्वपूर्ण संदेश देत आपले आप्त आणि अन्य धर्मांबद्दल प्रेम आणि करुणा या भावनाना सादर करतो, जो ईश्वराच्या नजरेत एक समान आहे. हे गाणे बंधुता आणि एकतेचा संदेश देते. हे तिसरे गाणे असून 'प्यारे करोना' आणि 'तेरे बिना' नंतर लॉकडाउन दरम्यान रिलीज केले आहे. हे गाणे देखील सलमान खान याने स्वतः गायले आहे.
लॉकडाऊनमध्ये सलमानने स्वत:चं युट्यूब चॅनल लॉन्च केलं आहे. या आधी याच चॅनलच माध्यमातून त्याने प्यार कोरोना, तेरे बीन ही गाणी लॉन्च केली. या दोन्ही गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या लॉकडाऊनमध्ये सलमान आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. त्यामुळे या वर्षी चित्रपट नसला तरी व्हिडिओ लॉन्च करून सलमान चाहत्यांना ईदी देणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight