श्रद्धा कपूरने राजस्थानच्या गावकऱ्यांचे केले कौतुक

प्राण्यांच्या मदतीसाठी केलेल्या नि:स्वार्थ प्रयत्नांसाठी श्रद्धा कपूरने राजस्थानच्या गावकऱ्यांचे केले कौतुक !
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे प्राणीप्रेम आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. श्रद्धा कपूरने प्राण्यांची मदत आणि त्यांना वाचवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक वेळा याविषयी आवाज देखील उठवला आहेनुकतेच अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक लेख शेअर केला आहे ज्यामध्ये राजस्थानमधील गावकर्यांनी भटक्या आणि तहानलेल्या जनावरांच्या मदतीसाठी जलाशय तयार केले आहेत.
श्रद्धाने गावकऱ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करताना लिहिले की, “राजस्थानमधील पाली गावातील गावकऱ्यांकडून या प्राण्यांसाठी दाखवण्यात आलेली सहानुभूति कौतुकास्पद आहे. आपण केलेल्या नि:स्वार्थ प्रयत्नांसाठी आभार💫💜”
अभिनेत्री नुकतेच पेटा (PETA)  द्वारे बनवण्यात आलेल्या एका व्हिडियोचा भाग झाली होती ज्यामध्ये प्राण्यांना कैदेत ठेवणे आणि प्राणीसंग्रहालये बंद करण्याबाबत विचार मांडण्यात आला होता. प्राण्यांच्या मदतीसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या अनेक संघटनांना श्रद्धा वेळोवेळी मदत करत असते.                                                          https://twitter.com/shraddhakapoor/status/1265220229946241026?s=21

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable