‘सा रे ग म प’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे नवीन गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. आता हेच लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. निमित्त आहे सा रे ग म प या अभुदपूर्व कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव. प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमाने २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. हे सगळं प्रेक्षकांच्या भरगोस प्रतिसादामुळेच शक्य झालं आणि म्हणून या २५ वर्षाच्या प्रवासातील साथीदार असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे 'एक देश एक राग' कॉन्सर्ट.
या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लोकप्रिय लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. तसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवन, रेणुका शहाणे, अमृता सुभाष, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत, सोबत स्वानंद किरकिरे, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत, रवी जाधव, स्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे
एक विशेष सोहळा जिथे असतील गाणी, किस्से आणि २५ वर्षांची धमाल, त्यामुळे चला गाऊया आणि टेन्शन अनलॉक करूया. पाहायला विसरू नका 'सा रे ग म प एक देश एक राग’चा हा विशेष सोहळा रविवार २४ मे संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable