नीलकमल
नीलकमलतर्फे कोविड-१९चे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादन सोल्यूशन्स सादर
~ ब्रॅण्डकडून वाढत्या हेल्थकेअर पायाभूत सुविधा गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पादन रेंजमध्ये वाढ ~
Mumbai, 21st May 2020 : भारताचा लोकप्रिय फर्निचर ब्रॅण्ड नीलमकलने खास उत्पादनांची व्यापक रेंज सादर केली आहे. या रेंजमध्ये कोविड क्वारंटाइन बेड, ७ पोझिशन आयसोलेशन बेड, व्हायरसगार्ड पार्टिशन, ट्रॅव्हलगार्ड पार्टिशन आणि हँड वॉश स्टेशन्स यांचा समावेश आहे. ब्रॅण्डने क्विक कोविड बेड देखील सादर केले आहे. हे उत्पादन सर्वात किफायतशीर असून हे असेम्बल व इन्स्टॉल करण्यासाठी ३ मिनिटांहून कमी वेळ लागतो.
या नाविन्यपूर्ण उत्पादनांबाबत बोलताना नीलकमल लिमिटेडच्या कार्यसंचालनांचे उपाध्यक्ष श्री. अजय अग्रवाल म्हणाले, ''कोरोनाव्हायरस महामारीमुळे बाजारपेठेमधील पोकळी भरून काढणा-या उत्पादनांची पूर्तता करण्यासाठी नाविन्यपूर्ण व उपयुक्त सोल्यूशन्सची गरज वाढली आहे. एक कंपनी म्हणून नीलकमलने सुविधा उभारत या आवश्यकतांची पूर्तता करण्याचे काम हाती घेतले आहे. ही नाविन्यपूर्ण उत्पादने अद्वितीय सोल्यूशन्स निर्माण करण्यासाठी अहोरात्र काम करत आलेल्या आमच्या संशोधन व विकास टीमच्या मेहनतीचे फळ आहेत. आम्हाला आशा आहे की, हे सोल्यूशन्स या महामारीविरोधातील लढ्यामध्ये सर्व भागधारकांना लाभदायी ठरतील.''
नीलकमलने तात्पुरते आपत्कालीन हॉस्पिटल तयार करण्यासाठी एमएमआरडीएला १००० कोविड क्वारंटाइन बेड्स, मॅट्रेसेस आणि इतर फर्निचरचा यशस्वीरित्या पुरवठा केला आहे. एमएमआरडीएने हे हॉस्पिटल २ आठवड्यांच्या विक्रमी कालावधीमध्ये उभारले आहे. रूग्णांना आरामदायीपणे व सोयीस्करपणे सुविधा मिळण्याची बाब लक्षात घेत बेड्ससोबत पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
नीलकमलने ३ नाविन्यपूर्ण बेड डिझाइन्स सादर केल्या आहेत.
नीलकमलचे कोविड क्वारंटाइन बेड हे ब्रॅण्डच्या समर्पित डिझाइन व विकास टीमच्या मेहनतीचे फळ आहे. किफायतशीर असण्यासोबत हे बेड्स वापरासाठी सुसज्ज आहेत. या बेड्समुळे उत्पादन असेम्बल करण्याचे त्रासदायक काम दूर होते. हे बेड्स सुलभपणे वापरता व स्टोअर करण्यासोबत सहजपणे वाहून नेता येतात. बेडसोबत एक बहुउद्देशीय कॅबिनेट येते, जी बेडच्या बाजूला असलेल्या टेबलाप्रमाणे स्टोरेज, डायनिंगची सुविधा देते. नीलकमलचे क्वारंटाइन व आयसोलेशन बेड्स देशातील झारखंड, सोलापूर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व ठाणे येथील विविध हॉस्पिटल्समध्ये वापरले जात आहेत.
नीलकमल ७ पोझिशन आयसोलेशन बेड हा एक अँग्युलर बेड आहे, जो रूग्णांना सुलभपणे श्वासोच्छ्वास मिळण्याची खात्री देतो. यामध्ये एक ऑक्सिजन सिलिंडर व सलाइन हूकसह एक यंत्रणा आहे. या यंत्रणेअंतर्गत ६५ अंशापर्यंत अवलंबून राहू शकते. यामध्ये वरील बाजूस वेन्टिलेशन असून हवानिर्मित संसर्ग कमी करण्यासाठी ३६०-अंश संरक्षणात्मक पारदर्शक कव्हरिंग असते. तसेच यामध्ये पावडर-कोटेड मेटल फ्रेम आणि नॉकडाऊन असेम्ब्ली वैशिष्ट्य आहे.
उच्च क्षमतेच्या प्लास्टिक शीट्सपासून बनवण्यात आलेले नीलकमलचे क्विड कोविड बेड दीर्घकाळापर्यंत टिकतो आणि अत्यंत किफायतशीर आहे. हा बेड ३ मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये असेम्बल करता येऊ शकतो. हा बेड निर्जंतुकांसह सुलभपणे स्वच्छ व सॅनिटाईज करता येतो आणि १०० टक्के वॉटरप्रूफ असून पुनर्चक्रण करता येते. हा बेड वजनाने हलका असल्यामुळे सहजपणे वाहून नेता येतो आणि या बेडची ३०० किग्रॅपर्यंतचे वजन वाहून नेण्याची उच्च क्षमता आहे. तसेच या बेडला वाळवी लागत नाही आणि जीवाणूमुक्त असण्यासोबत कार्डबोर्ड बेड्सप्रमाणे या बेडमधून दुर्गंधी येत नाही.
व्हायरसगार्ड हा संसर्गाचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्याकरिता कॅन्टीन्स व कॅफेजना उपयुक्त असे आरोग्यदायी व सुरक्षित टेबल टॉप डिवायडर आहे. हे १०० टक्के पुनर्चक्रण होणारे डिवायडर्स सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यामध्ये मदत करतात. ते टिकाऊ व किफायतशीर असण्यासोबत सुलभपणे तयार व स्थापित करता येतात. तसेच ते वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असण्यासोबत कोणत्याही निर्जंतुक साधनासह सुलभपणे स्वच्छ व सॅनिटाईज करता येतात आणि सर्व विद्यमान टेबल्ससाठी सुसंगत आहेत. त्यांचे सरळ पृष्ठभाग जीवाणू निर्माण होण्याला प्रतिबंध करतात. ते ग्राफिक्सच्या माध्यमातून सानुकूल करता येऊ शकतात आणि सेल्फ-स्टॅण्डिंग आहेत. नीलकमलची नवीन ऑफरिंग ट्रॅव्हलगार्ड पार्टिशन आहे. हे पार्टिशन्स सार्वजनिक परिवहन बसेसमधील आसनांदरम्यान बसवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मदत होते.
नीलकमल हँड वॉश स्टेशन उच्च दर्जाच्या व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवण्यात आले आहे. आरोग्यदायी डिझाइन पाण्याच्या कार्यक्षम वापराची खात्री देते. हे उत्पादन सुलभपणे व सहजपणे स्थापित करता येते आणि आवश्यक शारीरिक अंतरासंदर्भातील नियमांची पूर्तता करते. कमी उंचीमुळे हे उत्पादन अडचणीच्या जागांमध्ये देखील सुलभपणे स्थापित करता येते.

Comments
Post a Comment