दानशूर विक्रम गोखले

विक्रम गोखले यांचे औदार्य 
काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे विक्रमजींचे वडील. जे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून देत असत. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले यांनी त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे चालू ठेवला असून दरवर्षी त्यांनीही हे मदतकार्य चालूच ठेवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रमजींनी स्वतः मदत तर केली आहेच परंतु बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
विक्रमजींनी ज्येष्ठ कलावंतांची नेहमी होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे. आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करणेसाठी सदर जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आश्रम उभा करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.
विक्रम गोखले (ज्येष्ठ अभिनेते)  - ९६१९७८२८११ / ९८६९८४४४४४
मेघराज राजेभोसले (अ.भा.म.चि.महामंडळ अध्यक्ष) - ९८२२४५४४४१

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight