दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण लॉकडाउनच्या काळात ऐकते आहे ऑनलाइन स्क्रिप्ट्स !
देश दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउनमध्ये आहे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. अधिकाधिक लोक घर काम करत आहेत आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव देखील या यादीत  सामील आहे. अभिनेत्री या दिवसांमध्ये ऑनलाईन स्क्रिप्ट्स नरेशन मध्ये आपला वेळ घालवत आहे. 
दीपिका कलाकाराच्या नात्याने, या लॉकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करते आहे आणि चित्रपट निर्मात्यांसोबतच्या वर्चुअल मीटिंग सुरु आहेत. हा दीपिकासाठी  नवा आधुनिक डिजिटल पर्याय आहे. 
अभिनेत्री आपल्या आधी घोषित झालेल्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करते आहे आणि सोबतच आपले आगामी प्रोजेक्ट निवडण्यासाठी आणि जगभरातील चाहत्यांसाठी अधिक यादगार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून नव्या स्क्रिप्ट्स पण ऐकत आहे. 
जर लॉकडाउन नसता, तर दीपिका आता श्रीलंकेमध्ये शकुन बत्रा यांच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असती, ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील दिसणार आहेत. 
आतापर्यंतच्या आपल्या प्रवासात, दीपिका ने आपल्याला अनेक उल्लेखनीय चित्रपट आणि व्यक्तिरेखा दिल्या आहेत, ज्यामध्ये पिकू, ये जवानी है दीवानी मधील नैना, बाजीराव मस्तानी मधील मस्तानी, कॉकटेलची वेरोनिका इत्यादींची यादी न संपणारी आहे, ज्यांनी आपल्या मनात खास जागा निर्माण केली आहे. अभिनेत्रीने खरोखरच आपल्या अभूतपूर्व फैन फॉलोइंगसोबत आपल्या करियरला अत्युच्च ठिकाणी पोहोचवले आहे. तिची अविश्वसनीय अदाकारी आणि आपल्या व्यक्तिरेखांना आकार देण्याची हतोटी निश्चितच कौतुकास्पद आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight