घरच्यांसोबत क्वालिटी टाईम - हार्दिक जोशी
लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे प्रेक्षकांचे लाडके कलाकार देखील घरीच आहेततुझ्यात जीव रंगला मधील सर्वांचा आवडता राणादा सध्या लॉकडाऊनमध्ये काय करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेतमालिकांचं चित्रीकरण बंद झाल्यापासून हार्दिक बोईसर येथे त्याच्या गावी कुटुंबासोबत राहतोय आणि सध्या मिळालेला वेळ साकारात्मक घालवण्याचा प्रयत्न करतोय.

याबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, "सध्या माझा दिनक्रम सकाळी लवकर उठणेव्यायाम करणेघरकामात आईला मदत करणेघरातल्या अंगणात झाडे लावणेसंध्याकाळी घरच्यांसोबत खेळणेपुन्हा व्यायाम करणे असा आहेमाझे कुटुंबीय मुंबईत असतात पण मी तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त गेली  वर्ष कोल्हापुरात आहेतीन महिन्यानंतर  ते  दिवस सुट्टीमध्ये मी मुंबईला घरी यायचोत्यामुळे  वर्षात घरच्यांना पुरेसा वेळ देता आला नाहीपण आता लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा मी परिवारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतोयगेली चार वर्ष मी आईच्या हातचं जेवण मिस करत होतो पण आता मी आईच्या हातच्या पोळी भाजीचा पुरेपूर आस्वाद घेतोयगेले  महिने शूटिंग बंद असलं तरीपण मी मिळालेल्या वेळात सिनेमे आणि वेब सिरीज बघतोयकलाकार म्हणून त्यातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करतोयया दरम्यान घडलेली एक वाईट घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा कुत्रा 'बडीआम्हाला कायमचा सोडून गेलामाझ्यासाठी बडी म्हणजे माझं बाळ होतंत्याच्या जाण्याचं दुःख असलं तरी देखील त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्यासोबत चांगला वेळ घालवता आला याचं समाधान आहे." 

Comments

Popular posts from this blog

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..